डोंबिवली : आधारवाडी आणि पंढरपूर जेलमधून पळालेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात - पुढारी

डोंबिवली : आधारवाडी आणि पंढरपूर जेलमधून पळालेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा

आधारवाडी जेल मधून पळून गेलेल्या आरोपीला महात्मा फुले पोलिस ठाण्याने अटक केली असून, हा आरोपी पुन्हा चोरी करताना पोलिसांना आढळून आला. विशेष म्हणजे या आरोपीवर पंढरपूर, पैठण तसेच परळी वैजनाथ येथे देखील गुन्हे दाखल असून हा आरोपी यापूर्वी पंढरपूर कारागृहातूनही पळून गेला होता. यावेळी त्याच्याकडून 45 हजार 500 रुपयांचा माल जप्त केला आहे.

भिवंडी येथे राहणारा अविनाश कैलाश गायकवाड (वय 26) याने हात गाडीवर फळे खरेदी करणाऱ्या एका ग्राहकाचा मोबाईल चोरी केला. त्यानंतर कल्याण येथील बस स्टँड परिसरात येणार असल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी रचलेल्या सापळ्यात तो सापडला. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला.

हेही वाचा

Back to top button