पालघर : मनोर-विक्रमगड रस्त्यावर दोन दुचाकींची धडक; दोन जण ठार | पुढारी

पालघर : मनोर-विक्रमगड रस्त्यावर दोन दुचाकींची धडक; दोन जण ठार

मनोर ; पुढारी वृत्तसेवा पालघर जिल्ह्यातील मनोर – विक्रमगड हमरस्त्यावरील बोरांडा गावच्या हद्दीत काल (शनिवार) सायंकाळी भरधाव वेगातील दोन दुचाकींची एकमेकांना धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. महामार्गालगतच्या नांदगाव तर्फे मनोर गावच्या राहुल कामडी आणि विक्रमगड तालुक्यातील बांधन गावतील सुहास संखे यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. मनोर पोलीस ठाण्यात या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघातात किरकोळ जखमी असलेल्या एकावर मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी की, मनोर विक्रमगड रस्त्यावर बोरांडा गावच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील होंडा शाईन (MH48AU5918) आणि बुलेट (MH04GV6005) या दुचाकींचा एकमेकांना धडकून अपघात झाला. या अपघातातील गंभीर जखमींना मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तपासणी अंती राहुल कामडी आणि सुहास संखे यांना मृत घोषित करण्यात आले. एका दुचाकीवरील सहप्रवाशी देखील गंभीर जखमी असून, त्यांच्यावर मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : 

Back to top button