CM Eknath Shinde : महाविकास आघाडीला आहे 'त्या' जागाही राखता येणार नाहीत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

CM Eknath Shinde : महाविकास आघाडीला आहे 'त्या' जागाही राखता येणार नाहीत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात अडीच वर्षात कामेच झाली नाहीत. नकारात्मकता, नैराश्य होतं. सगळे प्रकल्प जे सुरु केलेले ते बंद केले. अशा काम न करणाऱ्या लोकांना जनता पसंती देईल की जे प्रकल्प थांबले होते ते युद्धपातळीवर चालना देवून सुरु केले त्यांना लोक पसंती देतील? हे तर सुर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माध्यमांशी करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

आज माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “या काही महिन्यात आम्ही, भाजप यांनी महाराष्ट्रात बरीच काम केली आहेत. या अडीत वर्षात कामेच झाली नाहीत. नकारात्मकता, नैराश्य होतं. सगळे प्रकल्प जे सुरु केलेले ते बंद केले. अशा काम न करणाऱ्या लोकांना जनता पसंती देईल की जे प्रकल्प थांबले होते ते युद्धपातळीवर चालना देवून सुरु केले त्यांना लोक पसंती देतील? हे तर सुर्यप्रकाशाएवढे सत्य आहे.” ते पुढे असेही म्हणाले की, या महाराष्ट्रातील जनता काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पाठिंबा देणारी आहे.

CM Eknath Shinde : छातीत धडकी भरली आहे

नुकत्याच ग्रामपंयाचतीच्या निवडणूका झाल्या, बरेच लोक बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हेच येणाऱ्या निवडणुकांचं स्पष्टीकरण आहे का? यावर बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, “हा ओघ पाहून महाविकास आघाडीची घाबरगुंडी उडाली आहे, त्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. छातीत धडकी भरली आहे. त्यामूळे ते आपल्या पक्षातील लोेक इतर पक्षात जात आहेत यासाठी ते खटाटोप करत आहेत.” पुढे बोलत ते असेही म्हणाले की,” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जी लोकप्रियता आहे त्यावरुन हे लक्षात येतं की, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जुने सर्व रेकॉर्ड मोडले जातील. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमी निकाल हाती  येईल. महाविकास आघाडीला ज्याकाही जागा आहेत त्याही राखता येणार नाहीत. मी कोणावर टीका करु इच्छित नाही.”

हेही वाचा

Back to top button