ठाण्यात शिवसेनेच्या शिंदे- ठाकरे गटात हाणामारी | पुढारी

ठाण्यात शिवसेनेच्या शिंदे- ठाकरे गटात हाणामारी

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : उड्डाणपुलावरून ठाण्यात राष्ट्रवादी आणि शिंदे गटात वाद रंगला असताना सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात ठाकरे आणि शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याने वातावरण तापले आहे. पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. निमित्त होते संजय घाडीगांवकर यांची उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती. यावेळी खासदार राजन विचारे यांच्या दिशेने बॉटल फेकण्यात आली, सुदैवाने त्यांना लागली नाही.

Nashik : गारठ्याचा आरोग्यावर परिणाम, नागरिकांना सर्दी-खोकल्याचे आजार

संजय घाडीगावकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर कोपरी पाचपाखाडी भागात ठाकरे यांना ताकद मिळाली. हा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असून ते किसननगर या ठिकाणी राहत होते. त्याच भागातील संजय घाडीगांवकर यांची ठाणे जिल्हा उपप्रमुख पदी नियुक्ती झाली. त्यांच्या नियुक्तीनंतर शुभेच्छा देण्यासाठी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे यांचासह अन्य पदाधिकारी पोहचले आणि एकच राडा झाला. बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतले. माजी नगरसेवक योगेश जानकर यांच्या कार्यकर्ते आले आणि एकच राडा झाला. उभे असलेल्या एका कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. पोलिसांच्या समक्ष हाणामारी झाली आणि वातावरण तंग झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button