ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील दुचाकीच्या अपघातात तीन ठार | पुढारी

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील दुचाकीच्या अपघातात तीन ठार

कसारा; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई-नाशिक महामार्गावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू
झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये 8 वर्षीय मुलाचा समावेश आहे. शहापूर तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर गुरुवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास उंबरमाळी येथे अमन हॉटेलजवळ हा अपघात झाला.

जयराम सोमनाथ बांबळे (वय 8 रा. उबरमाळी), बबन साबळे वय 50, अकोले (पाडोशी), मस्तान (पूर्ण नाव माहिती नाही) अशी मयताची नावे आहेत तर नीलकठ मुत्ते, दत्ता हिले हे जखमी झाले आहेत. अपघताची माहिती मिळताच
आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य, महामार्ग पोलीस शहापूर केंद्रचे कर्मचारी,कसारा पोलीस घटनास्थली दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने आपघातग्रस्तांना महामार्ग पोलीसाच्या गाडीत खर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले दरम्यान यावेळी टोल कंपनीची रुग्णवाहीका फोन करून देखील उपलब्ध झाली नाही.

या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघाताच्या गुन्ह्याचा
तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button