ठाणे : प्लास्टिकचे साहित्य असलेल्या गोडाऊनला भीषण आग | पुढारी

ठाणे : प्लास्टिकचे साहित्य असलेल्या गोडाऊनला भीषण आग

अंबरनाथ; पुढारी वृत्तसेवा : अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात असलेल्या प्लास्टिकच्या साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली.  दरम्यान हे गोडाऊन मानवी वस्तीत असल्याने एकच गोंधळ उडाला.

ही आग मोठ्या प्रमाणात असल्याने आगीचे लोट हे मानवी वस्तीत येत हाेते. कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे हे गोडाऊन उभारण्यात आले आहे. शिवाय अनेक भंगार माफीयांनी आपले बस्थान इथे मांडले आहे. त्यांच्यावर पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना इथे वारंवार होत असल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे. या दुर्घटनांमुळे इथल्‍या नागरिकांना याचा मोठा त्रास होतो. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन बंबांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण समजू शकलेले नाही.

हेही वाचा 

Back to top button