ठाणे : महिलेनेच आखला दरोड्याचा डाव | पुढारी

ठाणे : महिलेनेच आखला दरोड्याचा डाव

अंबरनाथ; पुढारी वृत्तसेवा :  येथील प्रसिद्ध डॉक्टर हरीश लापसिया यांच्या बंगल्यात तीन महिन्यांपूर्वी दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये तब्बल एक कोटींपेक्षा जास्त रकमेचे हिरे, ऐवज व रोख र ?म घेऊन चोरट्यांनी पोबारा केला होता. विशेष म्हणजे चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डिव्हीआर देखील चोरून नेल्याने या गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र मोठ्या शिताफीने पोलिसांनी या चोरट्यांना शोधून काढले व त्यांना अटक देखील केली. या गुन्ह्यात पोलिसांनी 9 आरोपी अटक करून त्यांच्याकडून 64 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहराच्या पूर्व भागातील प्रसिद्ध डॉ. हरीश लापसिया आणि त्यांची पत्नी डॉ. उषा लापसिया यांचा कानसई परिसरात बंगला असून त्याच ठिकाणी त्याचे उषा नर्सिंग होम नावाने हॉस्पिटल आहे. डॉ. हरीश लापसिया यांच्या बंगल्यात 11 सप्टेंबर रोजी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. त्यावेळी डॉ. हरिश लापसिया हे स्टेशन परिसरातील त्यांच्या दवाखान्यात रूग्ण तपासत असतांना, त्यांची पत्नी घरी एकट्याच होत्या. मात्र चार सशस्त्र दरोडेखोरांनी कानसई येथील रूग्णालयातील एक रूग्ण, परिचारिका आणि इतर कर्मचार्‍यांना एका खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर वरील
मजल्यावर घरात एकट्या असलेल्या डॉ. उषा लापसिया यांना चाकूचा धाक दाखवत घरातील तिजोरित ठेवलेले 1 कोटी 1 लाख 86 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने, हिरे तसेच घरातील रोख रक्कम लुटून नेली होती. तसेच यासोबत सीसीटीव्हीचा डिव्हीआरही चोरला होता.

अखेर विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस शिपाई मंगेश वीर आणि पोलिस उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांना गुप्त बातमीदाराकडून संशयीत आरोपीबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा रचत या गुन्ह्यातील सात आरोपींना अटक केली आहे

नोकरीवरून काढल्याच्या रागातून केला प्लॅन

विशेष म्हणजे डॉ. लापसिया यांच्या रुग्णालयात काम करणारी लॅब टेक्निशियन ज्योती सालेकर (34) हिला आर्थिक गैर व्यवहार प्रकरणी काही महिन्यांपूर्वी नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. मात्र 2006 साला पासून डॉ. लापसिया यांच्याकडे नोकरीला असणार्‍या ज्योतीला डॉ. लापसिया यांचे आर्थिक व्यवहार, संपत्ती आणि घरातील इत्यंभूत माहिती होती. त्यामुळे नोकरीवरून काढल्याच्या रागातून ज्योती हिने तिच्या बहिणीचा पती, एक
ट ?ॅव्हल एजंट आणि काही सराईत गुन्हेगारांना सोबत घेत लापसिया यांच्या घरात चोरीचा डाव आखल्याची
कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत पूर्व प्रादेशिक कल्याण विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे.

एकूण नऊ आरोपींना अटक

या गुन्ह्यात पोलिसांनी चेतन दुधाने (30), हरीश घाडगे (28), अक्षय जाधव (26), कुणाल चोधरी (21), दीपक वाघमारे
(42), तुषार उर्फ बाळा सोळसे (41) आणि ज्योती सालेकर यांच्यासह चोरीचे दागिने खरेदी करणारे बदलापूर
येथील ज्वेलर बाबूसिंह चांदनसिंह चदाणा (28), आणि भिवंडी येथील ज्वेलर गोपाल रावरिया अशा एकूण
नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव, वरिष्ठ पोलिस
निरीक्षक अशोक भगत आदी उपस्थित होते.

Back to top button