ठाणे : पत्नीशी संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त करणार्‍याचा खून

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  दोन मित्रांमध्ये घरातच ओली पार्टी सुरू असताना एका मित्राने दुसर्‍या मित्राच्या पत्नीशी संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि संतापलेल्या पतीने धारदार हत्याराने सपासप वार मित्राची निर्घृण हत्या केली. ही घटना टिटवाळा भागातील
सावकरनगर परिसरात असलेल्या एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये घडली आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून खुन्याला अटक केली आहे. सागर खरात असे अटक केलेल्याचे आरोपीचे नाव आहे. तर महेश साबळे असे निर्घृण हत्या
झालेल्या मित्राचे नाव आहे.

कल्याण तालुक्यातील टिटवाळ्यातील सावकरनगरातल्या इमारतीच्या एका बंद फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजार्‍यांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनी 27 सप्टेंबर रोजी त्या बंद फ्लॅटचा दरवाजा उघडला असता एका तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत तरुणाची ओळख पटवून फौजदार दिलीप देशमुख व अन्य पोलिस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास सुरु केला. या तपासात धक्कादायक माहिती समोर आली होती.

Exit mobile version