ठाण्यात पुन्हा तब्बल 400 नव्या खड्ड्यांची भर | पुढारी

ठाण्यात पुन्हा तब्बल 400 नव्या खड्ड्यांची भर

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  मागील आठवड्यापासून कोसळणार्‍या पावसामुळे रस्त्यांची पुन्हा एकदा दुरावस्था झाली असून अवघ्या 12 ते 13 दिवसांत शहरात तब्बल 400 खड्डे पडले आहेत. ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग देखील मंदावला असून वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. दुसरीकडे पालिकेने 2 हजारांपेक्षा अधिक खड्डे बुजवण्याची दावा केला केला असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी असून खड्यांची संख्या कितीतरी अधिक असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

पावसाळा सुरु झाला की, शहरातील विविध भागात खड्डे पडण्यास सुरुवात होत असते. पावसाळ्यापूर्वीच ठाणे महापालिकेने
एमएमआरडीए, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आदी प्राधिकरणाची बैठक घेऊन प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे आपआपले बुजवावे अशा सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही ठामपा हद्दीत देखील शहराच्या विविध भागात
खड्डे पडल्याची बाब समोर आली आहे. त्यातही इतर प्राधिकरणाबरोबर महापालिका हद्दीत देखील खड्ड्यांची संख्या वाढत
असल्याचे चित्र मागील काही दिवसात दिसून आले आहे. त्यात 30 ऑगस्टपर्यंत पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांची संख्या 1
हजार 649 एवढी झाली. तर, एक हजार 517 खड्ड्यांची मलमपट्टी केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

मधल्या काळात रस्त्यांची परस्थिती समाधानकारक असताना मागील तीन ते चार दिवसापासून कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे खड्ड्यांची संख्या थेट 2 हजार 68 पोहोचली आहे. त्यापैकी एक हजार 908 खड्डे बुजविण्यात आले असून केवळ 160 खड्डे बुजविण्याचे शिल्लक असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, सध्याच्या घडीला रस्त्यांची परिस्थिती पाहता हा दावा देखील फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे

दिव्यात सर्वाधिक 582 खड्डे

गेल्या तीन ते चार दिवसापासून कोसळणार्‍या पावसामुळे ठाणे शहरात नव्या तब्बल 400 खड्डे वाढल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट दिसत आहे. त्यात पालिका हद्दीतील प्रभाग समितीत कुठे शंभर, कुठे दोनशे तर कुठे तीनशे तसेच दिवा प्रभाग समितीत सर्वाधिक
582 खड्ड्यांची संख्या आहे. प्राधिकरणानेखड्डे बुजवावे अशा सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही ठामपा हद्दीत
देखील शहराच्या विविध भागात खड्डे पडल्याची बाब समोर आली आहे.

Back to top button