दहीहंडी : कासा येथे गोविंदा पथकाऐवजी वानराने फोडली दहीहंडी | पुढारी

दहीहंडी : कासा येथे गोविंदा पथकाऐवजी वानराने फोडली दहीहंडी

कासा : महेंद्र पवार

दरवर्षी प्रथेप्रमाणे गोपाळकाला हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मानाची दहीहंडी म्हणून जवळपास २५ ते ३० हजार रुपये खर्च करून मोठया डीजेच्या आवाजात बाळगोपाळ, गोविंदा पथक नाचत गाजत दहीहंडी फोडत असतात.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावाने सण उत्सव यावर निर्बंध असल्याने परंपरा जपण्यासाठी दहीहंडीचा कार्यक्रम केला जात आहे. त्यानुसार कासा येथील सदाशिव उपहार गृहासमोर नेहमीप्रमाणे दहीहंडी बांधण्यात येते या वेळी देखील ती बांधण्यात आली.

कोणतेही गोविंदा पथक यावर्षी नसल्याने ही हंडी फोडावी कशी, अशा विचारात सर्व नागरिक असताना अचानक एक वानर झाडावरून दहीहंडी फोडण्यास अवतरले. त्याने नारळ खाली टाकत दहीहंडी फोडली आणि बांधलेली केळी फस्त केली.आणि निघून गेले. नागरिकांची समस्या चुटकी सरशी सोडविली. गोविंदा स्वतः वानरांच्या रूपात येऊन दही हंडी फोडून निघून गेला असे अनेक नागरिक म्हणत आहेत.

हेही वाचले का? 

Back to top button