ठाणे : पुढारी वृत्तसेवा : आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात 'बॉईज थ्री' या मराठी चित्रपटातील कलाकार तसेच सुप्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते यांनी विशेष हजेरी लावली. या चित्रपटातील कलाकारांसाठी स्टेजवर खास दहीहंडी बांधण्यात आली होती. दोन थर लावून या कलाकारांनी ही हंडी फोडली. यावेळी गायक अवधूत गुप्ते यांनी या चित्रपटातील गीत गाऊन गोविंदाचा उत्साह वाढवला.
दोन वर्षांनंतर वर्तकनगर येथे संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला दरवर्षी मराठी आणि हिंदी कलाकार हजेरी लावत असतात. यावर्षीही सकाळपासून अनेक कलाकारांनी या ठिकाणी हजेरी लावली. बॉईज थ्री या चित्रपटातीलही सर्व कलाकारांनी या उत्सवात आपली हजेरी लावली. चित्रपटातील गाणं अवधूत गुप्ते यांनी सादर केले. तर या गाण्यावर चित्रपटातील कलाकारांनीही ठेका धरला. तर प्रसिद्ध अभिनेता सुशांत शेलार यांनीदेखील हजेरी लावून गोविंदशी संवाद साधला.
हेही वाचलंत का ?