ठाणे : मुंब्य्रात मेफेड्रॉन ड्रग्ज विक्री करणार्‍या दोघांना अटक | पुढारी

ठाणे : मुंब्य्रात मेफेड्रॉन ड्रग्ज विक्री करणार्‍या दोघांना अटक

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  मुंब्रा पोलीस पथकाने दोघा ड्रग्ज पेडलरकडून मेफेड्रॉन अर्थात एमडी हे ड्रग्स जप्त केले असून दोघांना अटक केली आहे. दोघांच्या ताब्यातून 1 लाख 29 हजार 600 रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले आहे.

इरफान आलिम सय्यद (39, अमृतनगर, मुंब्रा) व रज्जक सिराउद्दीन रंगरेज (35, डायघर) यांना अटक केली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्यांकडून 1 लाख 29 हजार 600 रुपये किमतीचे 72 ग्रॅम
एमडी हस्तगत केले आहे.

Back to top button