ठाणे : तडीपार गुंडाला अटक  | पुढारी

ठाणे : तडीपार गुंडाला अटक 

उल्हासनगर; पुढारी वृत्तसेवा :  ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत तडीपार चोरट्याकडून चोरीच्या आठ मोटरसायकली उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी सलमान उर्फ बल्लू बाबा शेख याच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली.

पोलीस परिमंडळ 4 च्या हद्दीत मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले
होते. या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना अंबरनाथमधील शीतला माता मंदिराच्या बाजूला संजय नगरात राहणारा 23 वर्षीय सलमान उर्फ बल्लू बाबा शेख हा तडीपार असतानाही तो मोटरसायकल चोरी करत असल्याची बतमीदाराकडून मिळाली. त्यानुसार
सपोनि संपत फडोळ, पोउपनि किशोर महाशब्दे, सपोउपिन श्याम रसाळ, हवालदार रमेश केंजळे व अन्य पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेतले.

4 गुन्ह्यांची उकल
आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने शिवाजी नगर, मध्यवर्ती, खडकपाडा, उल्हासनगर 1 पोलीस ठाणे येथील मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून आठ मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अनिल मांगले यांनी सांगितले.

Back to top button