डोंबिवली : पत्नीवर सपासप वार | पुढारी

डोंबिवली : पत्नीवर सपासप वार

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : चारित्र्यावर संशय घेणार्‍या माथेफिरूने संतापाच्या भरात पत्नीवर चाकूने सपासप वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पत्नी जबर जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कल्याण स्कायवॉकवर घडली. पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर पळून जाण्याच्या बेतात असतानाच माथेफिरू विकास पाटील याला पादचार्‍यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रविणा पाटील हिला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर असलेल्या आंबिवली स्टेशजवळच्या परिसरात विकास पाटील हा पत्नी प्रविणासह राहतो. विकास हा प्रविणाच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. त्यामुळे विकास व प्रवीणामध्ये नेहमी खटके उडत असत. काही कामानिमित्त हे दाम्पत्य कल्याणमध्ये आले होते. रात्री कल्याण स्टेशनला जोडलेल्या
स्कायवॉकवरून हे दाम्पत्य जात होते. याच स्कायवॉकवर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून संतापलेल्या विकासने प्रविणावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रविणाच्या मान, गळा आणि छातीवर गंभीर दुखापत झाली.

विकासाने ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या हल्ल्यात जबर जखमी झालेली प्रविणा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. हे पाहूनमाथेफिरू विकासाने तेथून पळ काढला. मात्र स्कायवॉकवरील पादचार्‍यांनी पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांच्या मदतीने पादचार्‍यांनी जखमी प्रविणाला कल्याणमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले

Back to top button