कल्याण-डोंबिवली महापालिका, सीएची फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा | पुढारी

कल्याण-डोंबिवली महापालिका, सीएची फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण- डोंबिवली महापालिकेचे जंतुनाशक फवारणीचे कंत्राट मिळवण्यासाठी चार्टर अकाऊंटंट आणि फर्मची बनावट ओव्हर सर्टिफिकिट बनवले. त्यावर खोटी सही व शिक्का घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी दोन जणांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र सानप आणि रोहिदास भेरले अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, महापालिकेच्या घनकचरा विभागाचा ऑनलाईन निविदा नुकत्याच निघाल्या होत्या. त्या निविदा भरण्यासाठी महेंद्र आणि रोहिदास यांनी संगनमत करून चार्टर अकाउंटंट मेहराज शेख यांच्या फर्मचे बनावट टर्न ओव्हरचे सर्टिफिकीट बनवले. त्यावर मेहराज यांची खोटी सही व बनावट शिक्का मारला. या सर्टिफिकीटचा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या जंतू नाशक फवारणीचे कंत्राट मिळण्याकरता वापर केला. ही बाब सीए मेहराज यांच्या लक्षात येताच त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन महेंद्र आणि रोहिदास यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button