शिंदे गटात सामील झालेल्या अंबरनाथच्या आमदारांना जीवे मारण्याचे पत्र | पुढारी

शिंदे गटात सामील झालेल्या अंबरनाथच्या आमदारांना जीवे मारण्याचे पत्र

अंबरनाथ; पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व सध्या शिंदे गटात सामील झालेले अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या कार्यालयात गोळी घालून जीवे ठार मारण्याचे पत्र आल्याने खळबळ माजली आहे. पोस्टाने आलेल्या या पत्राची दखल पोलिसांनी घेतली असून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिंदे गटात सामील झालेले आमदार डॉ. बालाजी किणीकर त्यांच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी, ‘हो मी गद्दार आहे’ अश्या आशयाचे कागदी फलक शहरात विविध भागात लावण्यात आले होते. पोलिसांनी हे फलक काढून घेतले असले तरी किणीकर यांच्या विरोधातील रोष अंबरनाथ शहरात व्यक्त होताना दिसत आहे. त्यात त्यांना जीवे ठार मारण्याचे पत्र प्राप्त झाल्याने शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. या पत्राची दखल पोलिसांनी घेतली असून सद्या अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. याबाबत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याशी संपर्क साधला असता,फ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस योग्य तो तपास करतीलफ, असे त्यांनी बोलताना सांगितले.

पत्रातील हिंदी मजकूर

आमदार बालाजी तेरेको गोली मारनेका दिन आ गया है, हमारे अंबरनाथ के शिवसेना नेता को तकलीफ देता है इसिलिए तुझे मारने का है, बता इसलिये रहा हु जब में मारूंगा वह दिन तय है तब तक टू रोज डर डर के जिये.

Back to top button