कल्याण : केडीएमसीत 12 लाख 39 हजार मतदार | पुढारी

कल्याण : केडीएमसीत 12 लाख 39 हजार मतदार

कल्याण पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आगामी सार्वत्रिक पालिका निवडणुकी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्दे शानुसार प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पालिका निवडणुकीसाठी 44 प्रभागांकरिता 12 लाख 39 हजार 130 मतदारांची यादी घोषित करण्यात आली असून हे मतदार पालिकेतील सत्ताधार्‍यांची निवड करणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कल्याण-डोंबिवली पालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक पालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम देण्यात आला होता. त्यानुसार 31 मे 2022 च्या अस्तित्वात असलेल्या पालिका क्षेत्रातील कल्याण पश्चिम (138), कल्याण पूर्व (142), डोंबिवली(143) व कल्याण ग्रामीण (144) या चारही विधान सभेच्या विधान सभा मतदार यादींची फोड करून पालिकेच्या 44 प्रभागांसाठी प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पालिका क्षेत्राची सन 2011 च्या जनगणने नुसार एकूण 15 लाख 18 हजार 762 लोकसंख्या असून पालिकेत प्रथमच त्रिसदस्यीय पद्धतीने निवडणूक घेतली जाणार आहे. पालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 44 प्रभाग असणार असून यामध्ये तीन सदस्यांचे 43 प्रभाग व चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. 44 प्रभागांच्या निवडणुकी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत 12 लाख 39 हजार 130 मतदार संख्या असून यामध्ये 6 लाख 61 हजार 822-पुरुष मतदार, 5 लाख 76 हजार 934 स्त्री मतदार तर 374 तृतीयपंथी मतदार आहेत.

मतदार यादीतील हरकतींसाठी येथे संपर्क करा निवडणूक विभाग, कल्याण-डोंविली महानगरपालिका (मुख्यालय), शंकरराव चौक, कल्याण पश्चिम 1/अ, प्रभाग समिती कार्यालय, वडवली, ता. कल्याण. 2/, प्रभाग समिती कार्यालय, संघवी इस्टेट, बारावे रोड, कल्याण पश्चिम, 3/क, प्रभाग समिती कार्यालय, श्री स्वामी दामोदराचार्य हॉल, पहिला मजला, सांगळेवाडी, कल्याण पश्चिम, 4/जे प्रभाग समिती कार्यालय, भगवती अभिलाषा कन्वेंचर, लोकग्राम तिकीट काऊंटर समोर, कल्याण पूर्व, 5/ड प्रभाग समिती कार्यालय, पुनालिक रोड, काटेमानिवली, कल्याण पूर्व, 6 फ प्रभाग समिती कार्यालय, पीपी चैंबर, भगतसिंग रोड, डोंबिवली पूर्व. 7/ह प्रभाग समिती कार्यालय, उमेश नगर, गरीबाचा वाडा, डोंबिवली पश्चिम 8/ग प्रभाग समिती कार्यालय सुनील नगर, डिएनसी रोड, डोंबिवली पूर्व, 9/ आय प्रभाग समिती कार्यालय, मंगेशी संस्कार इमारत, खडेगोळवली, विठ्ठलवाडी पूर्व, 10/ ई प्रभाग समिती कार्यालय, रिजेन्सी कॉम्प्लेक्स, दावडी रोड, वैकटेश पेट्रोलपंप जवळ, डोंबिवली

मतदार यादीतील हरकतींसाठी येथे संपर्क करा 

 • निवडणूक विभाग, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
  (मुख्यालय), शंकरराव चौक, कल्याण पश्चिम
 • 1/अ, प्रभाग समिती कार्यालय, वडवली, ता. कल्याण.
 • 2/ब, प्रभाग समिती कार्यालय, संघवी इस्टेट, बारावे रोड,
  कल्याण पश्चिम,
 • 3/क, प्रभाग समिती कार्यालय, श्री स्वामी दामोदराचार्य हॉल,
  पहिला मजला, सांगळेवाडी, कल्याण पश्चिम,
 • 4/जे प्रभाग समिती कार्यालय, भगवती अभिलाषा कन्वेंचर,
  लोकग्राम तिकीट काऊंटर समोर, कल्याण पूर्व,
 • 5/ड प्रभाग समिती कार्यालय, पुनालिक रोड, काटेमानिवली,
  कल्याण पूर्व,
 • 6 फ प्रभाग समिती कार्यालय, पीपी चैंबर, भगतसिंग रोड,
  डोंबिवली पूर्व.
 • 7/ह प्रभाग समिती कार्यालय, उमेश नगर, गरीबाचा वाडा,
  डोंबिवली पश्चिम
 • 8/ग प्रभाग समिती कार्यालय सुनील नगर, डिएनसी रोड,
  डोंबिवली पूर्व,
 • 9/ आय प्रभाग समिती कार्यालय, मंगेशी संस्कार इमारत,
  खडेगोळवली, विठ्ठलवाडी पूर्व,
 • 10/ ई प्रभाग समिती कार्यालय, रिजेन्सी कॉम्प्लेक्स, दावडी रोड,
  वैकटेश पेट्रोलपंप जवळ, डोंबिवली

Back to top button