कल्याण गँगरेप प्रकरणी आठ आरोपींच्या कोठडीत चार दिवसांची वाढ | पुढारी

कल्याण गँगरेप प्रकरणी आठ आरोपींच्या कोठडीत चार दिवसांची वाढ

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण पूर्व येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. या घटनेमुळे या मुलीने आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांनी केवळ कलम ३०६ आणि ३५४ हे कलम लागू केले होते. मात्र पोलिसांनी आरोपींवर लावण्यात आलेल्या कलमांमध्ये वाढ केली आहे. आरोपींवर ३०५, ३७६ (ड), आयटी कलम ६६ ई आणि ६७ बी हे कलम लावण्यात आले आहेत. दरम्यान आज आरोपींना कोर्टात उभे केले असताना न्यायाधीशांनी पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.

कल्याण पूर्व येथे राहणाऱ्या एका मुलीवर अत्याचार करून तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करण्यात येत होते. या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर तिने आत्महत्या केली. मात्र तिने तिच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट लिहून ठेवली होती. सुसाईड नोटचा आधार घेत पोलिसांनी तपास सुरू केला. प्रथम दर्शनी पोलिसांनी कलम 306 आणि 354 दाखल केले. त्यानंतर जशी चौकशी सुरू झाली तसे कलम देखील वाढवण्यात आले आहेत. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सनी पांडे, विजय यादव, प्रमय तिवारी, शिवम पांडे, कृष्णा जयस्वाल, आनंद दुबे, निखिल मिश्रा, काजल जयस्वाल या आरोपींना अटक करून कल्याण न्यायालयात हजर केले असता, त्या सर्व आठ आरोपींना न्यायालयाने आज पुन्हा आधीक ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दुसऱ्या दिवशी मुलगी जाणार होती मुलाखतीला

ज्या दिवशी या मुलीने आत्महत्या केली त्याच्या दुसऱ्या दिवशी ही मुलगी मुलाखतीला जाणार होती. इतकेच नव्हे तर दोन दिवसांपूर्वी लागलेल्या बारावीच्या निकाला तिने तब्बल 71 टक्के मिळवून यश संपादन केले होते. त्यामुळे अशी मुलगी आत्महत्या करु शकत नाही असा आरोप नातेवाईक करत आहेत. आरोपी उच्चभ्रू घराण्यातील असल्याने आम्हाला संरक्षण द्यावे, अशी मागणी देखील ते सातत्याने करत आहेत

आरोपींवर लावण्यात आलेली अधिकची कलमे

  • 306 – आत्महत्येस प्रवृत्त करणे
  • 376 ड – सामूहिक बलात्कार
  • 354 – विनयभंग
  • 305 – अल्पवयीन मुलीची आत्महत्येस प्रवृत्ती करणे

Back to top button