कळवा येथे दरड कोसळून एकाच कुटुंबातील ५ जण ठार

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मुंबईमध्ये दरड कोसळून ३३ जणांचा बळी गेल्यानंतर कळवा मध्येही दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले आहेत. आज दुपारी २ च्या दरम्यान ही घटना घडली.

मृतांमध्ये तीन लहान मुले आणि आई वडिलांचा समावेश असून याच कुटुंबातील अन्य दोन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. रात्री उशिरा ही घटना घडली.

अधिक वाचा : 

डोंबिवली : अनधिकृत बांधकाम पाणी तुंबण्यास कारणीभूत, नागरिकांचा आरोप

मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे स्‍वत: कार चालवत पंढरपूरच्‍या दिशेने रवाना

कळवा
कळवा येथे दरड कोसळी.

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात या पाच जणांना नेण्यात आल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे.

प्रभू यादव वय ४५ वर्ष , विधावती यादव वय ४० वर्ष , अशी मृत झालेल्या आईवडिलांची नावे असून रवीकिशन यादव वय १२ वर्ष सिमरन यादव वय १० वर्ष आणि संध्या यादव वय ३ वर्ष अशी कळवा दुर्घटनेत मृत झालेल्या मुलांची नावे आहेत.

अधिक वाचा : 

मुंबई पाऊस : ‘गोकुळ’सह ‘वारणा’ दूध वितरणाला फटका

आशिष शेलार : मुंबईला हा धोक्याचा इशारा तर नाही ना?

कळवा
एनडीआरएफच्या जवानांनी ढिगाऱ्याखालून जखमींना बाहेर काढले.

तर याच कुटुंबातील अचल यादव वय १८ वर्ष आणि प्रीती यादव वय ५ वर्ष जखमी झाले असून त्यांना पालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, घनटास्ठळी एनडीआरएफचे जवान कार्यरत होते. त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले.

 

 

हेही वाचले का? 

पेगासस प्रकरणी विरोधकांचा लोकसभेत गदारोळ; कामकाज तहकूब

गुन्हेविश्व : भाजपच्या माजी नगसेवकाने दिलेल्या खूनाच्या सुपारीचा डाव फसला

पंढरपूर वारी : परवानगी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Back to top button