

सोलापूर : दिवाळी निमित्त सोलापूरच्या बाजारपेठेत फटाक्यांची खरेदी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यावर्षी पारंपरिक सुतळी बॉम्ब आणि लक्ष्मी तोट्यासोबतच बाजारात आलेल्या नाविन्यपूर्ण फटाक्यांना मोठी मागणी आहे.
तंत्रज्ञानाची झलक दाखवणाऱ्या ‘ड्रोन’ फटाक्याने तरुणाईला आकर्षित केले आहे. तसेच आकर्षक नवीन व्हरायटी बाजारात दाखल झालेल्या अनेक नवीन नमुन्यांपैकी ‘ड्रोन’ फटाका, ‘पॅराशूट रॉकेट’ आणि ‘डक झाड’ या तीन फटाक्यांची सर्वाधिक विक्री होत असल्याचे फटाका विक्रेत्याने सांगितले.
’ड्रोन’ फटाका विशिष्ट उंचीवर जाऊन रंगीबेरंगी प्रकाशाची आतिशबाजी करतो. ’पॅराशूट रॉकेट’ आकाशातून हळूवारपणे खाली उतरताना आकर्षक दृश्यांची निर्मिती करते. या फटाक्यांचे सर्वांनाच आकर्षण असल्याचे दिसते.
याशिवाय ’डक झाड’ हा प्रकार जमिनीवर विविध रंगांची सुंदर रोषणाई करत आहे, ज्यामुळे तो लहान मुलांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे.या नवीन व्हरायटीमुळे यंदाची शहर व परिसरातील नागरिकाीं यंदाची दिवाळी नेहमीपेक्षा अधिक धूम धडाक्यात आणि रंगीबेरंगी वातावरणात साजरी होईल.
बाजारात फटाक्यांचे प्रकार
बाजारात यंदा अनेक नवीन नमुने दाखल झाले आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या बंदुका, बिडी फटाका, हेलिकॉप्टर फटाका आणि फोटो फ्लॅश यांचा समावेश आहे. तसेच, रंगीबेरंगी झाड (कलर ट्री), रिसायकल व कलर फुल्ल चाकरी, कलर स्मोक, हॅण्ड शोट, मेरी गो राऊंड आणि पॅराशूट रॉकेट यांसारख्या वैविध्यपूर्ण फटाक्यांचीही विक्री सुरू आहे.