सोलापूर : तरुणीला घरी बोलावून तिच्यासमोर अश्लील कृत्य तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तरुणावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.1) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या घरासमोर बसली होती. यावेळी संशयित आरोपी योगेश माने (रा.सोलापूर) याने पीडित तरुणीस तुझ्याकडे काम आहे, घरात ये असे म्हणून इशारा केला.
त्यामुळे पीडित तरुणी ही तरुणाच्या घरात गेली. त्यानंतर त्या तरुणाने दरवाजा बंद केला आणि पीडित तरुणीच्या खांद्यावर हात ठेवून अश्लील कृत्य केले. यानंतर तरुणीने हात झटकत ओरडून ती बाहेर आली. तिने ही घटना तिने वडिलांना सांगितली. वडिलांनी याबाबत तरुणाला व त्याचे आईला जाब विचारत तरुणाच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.