अजित पवारांच्या आमदाराविरोधात पुतण्याने फुंकली बंडाची तुतारी 

आ. बबनराव शिंदे यांच्याविरोधात धनराज शिंदेचे बंड 
Dhanraj Shinde
आ. बबनराव शिंदे यांच्याविरोधात धनराज शिंदेचे बंड पुकारले.
Published on
Updated on

माढा : माढा विधानसभेचे आ. बबनराव शिंदे यांच्या विरोधात त्यांचे पुतणे माजी पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे यांनी जाहीरपणे बंडाची तुतारी फुंकली आहे. राज्यातील काका पुतण्याच्या लढतीचे लोण माढा मतदारसंघात पोहचले असून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे समर्थक आ. शिंदेंना पुतण्याच्या जाहीर भूमिकेमुळे मोठा धक्का मानला जात आहे 

Dhanraj Shinde
शरद पवारांच्या उपस्थितीत आज समरजित घाटगेंच्या हाती ‘तुतारी’

माढा तालुक्यातील मानेगाव येथे जाहीर सभा घेत धनराज शिंदे यांनी शुक्रवारी (दि.२७) आपली भूमिका मांडली. माढा तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तसेच तालुक्याच्या उज्वल भविष्यासाठी आपण माढा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन  त्यांनी केले. 

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, माढा तालुक्याचे राजकारण हे फक्त कारखानदार भोवतीच फिरत असून यापुढे ही निवडणूक कारखानदार सोडून होणार असून कारखाना विरहित निवडणूक आपण लढवित असून तालुक्याच्या अनेक प्रलंबित प्रश्न त्यामध्ये विविध गावांना जोडणारे रस्ते, वाड्या वस्तीवरील रस्ते, सरकारी दवाखाने, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुविधा सर्व बाबींची सोडवणूक करण्यासाठी आपण माढा विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाकडून लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, आमच्या कुटुंबाला सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्यापासून आजपर्यंत मदत होत आली आहे. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी कै.विठ्ठलराव शिंदे यांना इंदिरा गांधी यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवून दिली होती. आज मी विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची भेट घेऊन त्यांची निवड झाल्याबद्दल सत्कार केला तर माझ्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले. एका पक्षामध्ये काम करत असताना भेट घेतली. त्यामध्ये मी काही वेगळे केले नसून मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मदत मागितल्याने वेगळे काही सिद्ध होत नसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

पुढे ते म्हणाले, राजकीय परिस्थिती कशीही असो, ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच लढणार आहेत. त्यांनी शरद पवार यांच्याकडे माढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली असून लवकरच या संदर्भात अंतिम निर्णय अपेक्षित आहे. धनराज शिंदे यांनी त्यांच्या या भूमिकेमध्ये स्पष्टपणे सांगितले की, ते त्यांच्या समर्थकांसाठी आणि माढा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निश्‍चितपणे कार्यरत राहणार आहेत.  

सभेत अनेक मान्यवर नेते व सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी धनराज शिंदे यांनी केलेल्या विविध विकासकामांचा गौरव केला आणि त्यांना भविष्यातील नेतृत्व म्हणून साथ देण्याचे आश्वासन दिले. माणेगावमधील ही सभा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची ठरली असून यामुळे धनराज शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विकासाचा अजेंडा स्पष्ट झाला आहे.

   यावेळी नितीन तळेकर, डॉ आप्पासाहेब घाडगे, नानासाहेब देशमुख,मुन्नाराजे मोरे आदींनी जनतेच्या भावना परखड शब्दांत व्यक्त केल्या.यावेळी नानासाहेब देशमुख, मुन्नाराजे मोरे, वैभव महाडिक, सौरभ घाडगे, बाळासाहेब शेळके, बालाजी मोटे, सचिन पराडे, प्रमोद बेंदकर, आलम जमादार, शितल जोकर, तानाजी पराडे, नितिन तळेकर, सतिश पवार, आप्पासाहेब घाडगे, गोपाळ घाडगे, बापूसाहेब गवळी, गौरव पाडुळे, तसेच मानेगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dhanraj Shinde
NCPSP | सावध ऐका पुढल्या हाका; ‘तुतारी’ चिन्हावर सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news