सोलापूर : भरधाव ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणी ठार

हैदराबाद रोड महामार्गावरील घटना
Solapur Accident News
भरधाव ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणी ठार झाल्या.File Photo
Published on
Updated on

सोलापूर : भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.३०) दुपारी हैदराबाद रोड महामार्गावरून चंदन काट्याजवळ घडली. ज्योती यशवंत बडगंची (वय ५०, रा. दत्तनगर, सोलापूर) व जयंती कमलाकर उदगिरी (वय ५३, रा. सैफुल, सोलापूर) अशी या दोन बहिणींची नावे आहेत.

Solapur Accident News
गोंदिया : अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे जागीच ठार

ज्योती बडगंची व जयंती उदगिरी या दोघी बहिणी मोपेडवरून काही कामानिमित्त विडी घरकुलला मोपेड(एमएच १३ बीटी ४३३५) वरून गेल्या होत्या. काम आटोपल्यानंतर त्या दुपारी ३ वाजता विडी घरकुलमार्गे हैदराबाद रोड महामार्गावरून बोरामणी चौकाकडे येत होत्या. चंदन काट्याजवळ त्या आल्या असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १० झेड २६३९) ट्रकची त्यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. या अपघातात दोघीही गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत दोघींना शासकीय रुग्णालयात दाखल असता ज्योती बडगंची यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. तर जयंती कमलाकर यांचा उपचारादरम्यान सायंकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे. याप्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Solapur Accident News
दक्षिण कोरीयात हॉटेलला भीषण आग; ७ ठार, १२ जखमी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news