

सोलापूर : दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याप्रकरणी अटकेत असलेला पुण्यातील आयटी इंजिनिअर जुबेर हंगरगेकर हा मूळचा सोलापूरचा आहे. सोलापुरातील एका नामांकित महाविद्यालयात तो टॉपर होता. त्याचा भाऊ आणि मेहुणादेखील आयटी इंजिनिअर असल्याची माहिती समोर आली आहे.
दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याप्रकरणी आयटी इंजिनिअर जुबेर हंगरगेकर याला राज्य दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी अटक केली. जुबेर हा मूळचा सोलापूरचा रहिवासी आहे. शहरातील एका नामांकित महाविद्यालयात तो शिकण्यास होता. त्यावेळी तो महाविद्यालयात टॉपर विद्यार्थ्यांपैकी एक होता. अभ्यासात हुशार असलेल्या जुबेरने संगणक अभियंत्याची पदवी घेतली. त्यानंतर त्याला पुण्यात एका कंपनीत नोकरी लागली. त्याचा भाऊ आणि मेहुणादेखील आयटी इंजिनिअर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
पुण्यात काम करत असताना तो दहतवादी संघटनांच्या संपर्कात आला. त्याच्याकडून 19 लॅपटॉप, मोबाईल तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. झुगेर याच्या लॅपटॉपमधून काही धागेदोरे मिळाले आहेत. तसेच त्याच्या घरातून काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. तो अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो अल कायद्याच्या संपर्कात कसा आला? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.