Solapur News | सोलापूर-होसपेट, हुबळी एक्स्प्रेस रद्द एसटी आणि ट्रॅव्हल्सवर भार

अनेक गाड्यांच्या मार्गात बदल
Solapur News | सोलापूर-होसपेट, हुबळी एक्स्प्रेस रद्द एसटी आणि ट्रॅव्हल्सवर भार
Published on
Updated on

सोलापूर : हुबळी विभागातील विजयपूर- होटगी सेक्शनमधील लच्यान- तडवळ स्थानकादरम्यान भीमा नदी पुलाजवळ २५ सप्टेंबरला मालगाडीचे इंजिन रुळावरून घसरले. यामुळे येथील रूळ सेटलमेंटमुळे सोलापूरहून धावणारी सोलापूर- होसपेट मंगळवारपर्यंत (दि. १) तर सोलापूर-हुबळी बुधवारपर्यंत (दि. २) रद्द केली आहे.

अन्य गाड्याही रद्द केल्या आहेत. यामुळे प्रवाशांना आता सोलापूरहून होसपेटला जाण्यासाठी बाय रोड एसटी आणि ट्रॅव्हल्सने जावे लागणार आहे. हैदराबाद-विजयपुरा, रायचूर- विजयपुरा, सोलापूर-होसपेट तर सोलापूर-हुबळी बुधवारपर्यंत रद्द करण्यात आली आहे. धारवाड-सोलापूर ३० सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर, सोलापूर धारवाड ही एक व दोन ऑक्टोबर दरम्यान रद्द असेल. म्हैसूर-पंढरपूर एक्स्प्रेस २९, ३० सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर रोजी विजापूर ते पंढरपूर दरम्यान अंशतः रद्द, पंढरपूर-म्हैसूर एक्स्प्रेस ३० सप्टेंबर आणि एक व दोन ऑक्टोबर रोजी पंढरपूर ते विजापूर दरम्यान अंशतः रद्द असेल.

सीएसएमटी मुंबई-होसपेट २९, ३० सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर रोजी पुणे-मिरज-बेळगाव-हुबळी आणि गदग मार्गे धावेल. हुबळी- हैदराबाद ही गदग-बल्लारी-गुंटकल बायपास-रायचूर-वाडी बायपास आणि सुलेहली मार्गे धावेल. बनारस-हुबळी ही २९ सप्टेंबर रोजी दौंड कॉर्ड लाईन-पुणे-मिरज- बेळगाव-हुबळी मार्गे धावेल. हजरत निजामुद्दीन-हुबळी ही दौंड कॉर्ड लाईन-पुणे-मिरज-बेळगावी हुबळी मार्गे धावेल. बिकानेर-यशवंतपुर ही २९ आणि एक ऑक्टोबर रोजी पुणे- मिरज-बेळगाव-हुबळी मार्गे धावेल. साईनगर शिर्डी-म्हैसूर ही ३० सप्टेंबर रोजी बल्लारी-गुंटकल-वाडी-होटगी मार्गे धावणार आहे.

एस.टी. बसस्थानकावर गर्दी

चार दिवसांवर नवरात्रौत्सव आला आहे. कर्नाटकहून सोलापूरला व तुळजापूरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. पण, गाड्या रद्द असल्यामुळे रेल्वेचे प्रवासी आता एस.टी. बसकडे वळले आहेत. त्यामुळे सोलापूर बसस्थानकावर कर्नाटकहून येणाऱ्या प्रवासी आणि भाविकांची गर्दी दिसून येत आहे. शिवाय खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news