

सुनिल गजाकस
नातेपुते : नातेपुते शहरात मोठ्या प्रमाणावर आपले सरकार सेवा केंद्र (महा ई-सेवा केंद्रे ) अनियमित आहेत. त्यामुळे मनमानी पद्धतीने बेकायदेशीरपणे राजरोसपणे सुरू आहेत. याबाबत तक्रारी दाखल झाल्याने या तक्रारीची दखल खुद्द जिल्हाधिकारी यांनी घेऊन सात दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश माळशिरस तहसीलदार यांना दिला खरा, मात्र, महिना संपला तरी प्रांताधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचा आदेशावर माळशिरस तहसीलदार यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे अनियमित असलेली आपले सरकार सेवा केंद्रे राजरोसपणे मनमानी पद्धतीने सुरू आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशांची पायमल्ली केल्याचे दिसत आहे.
नातेपुते शहरात जवळपास तीन महा ई-सेवा केंद्राना परवानगी आहे. असे असताना नातेपुते येथे चक्क ऑनलाईन केंद्राचा बाजार भरला असल्याचे चित्र आहे. माळशिरस तालुक्यातील मोरोची, फडतरी, दहिगाव, कोथळे या ठिकाणी असलेली सेवा केंद्रे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करून रोजरोजपणे नातेपुते शहरात व्यावसायिक पद्धतीने दुकाने थाटुन कारभार करत आहेत.
सेवा केंद्र मंजूर ठिकाणी ज्या त्या गावात नागरीकांना जवळ सेवा मिळावी म्हणून शासनाने कायदा व सक्तीचे बंधनकारक नियम घालून ऑनलाईन केंद्राला मंजुरी दिली आहे. परंतू, माळशिरस तहसील कार्यालयाकडून कुठलीच कारवाई न करता ऑनलाईन केंद्र वाल्याची पाठराखण केल्याचा आरोपही नागरिक करत आहेत.
याबाबत माळशिरस तहसीलदार यांना विचारणा असता निश्चित कारवाई करणार आहे. मंडळ अधिकारी यांच्या मार्फत अहवाल घेऊन कारवाई करता,े असे म्हणून आतापर्यंत चालढकल केली आहे. दरम्यान, खुद्द प्रांत अधिकारी विजया पगारकर यांना विचारणा केली असता, त्यांनी अनियमित केंद्रावर कारवाई होणारच आहे. माळशिरस तहसीलदार यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आल्या आहेत, असे ही त्यांनी सांगितले.
परंतु माळशिरस तहसीलदार कार्यालयाकडुन कारवाई होत नसल्याने कारभार कुचकामी ठरत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून प्रांताधिकारी यांच्यामार्फत कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.