

सोलापूर : शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा शक्य नाही असे सांगणार्या महापालिका प्रशासनाने पुन्हा घूमजाव केले आहे. शहराच्या काही भागाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा चालू आहे. पाण्याचे तास कमी करून तीन गावठाण भागात दिवसाआड पाणी करण्याचे नियोजन असल्याचे महापालिका प्रशासनाने परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
तीन दिवसाआड पाणी पुुरवठ्यावरून महापालिकेतील दोन अधिकार्यांमध्ये वाद पेटला आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी तीन दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन नाही, असे बुधवारी जाहीर केेले. पाणी पुरवठ्यावरून दोन अधिकार्यांमध्ये सुसंवादाचा अभाव असल्याचे जाणवले. प्रशासनावर टिकेची झोड उठली असता महापालिका प्रशासनाकडून गुरूवार दि. 3 जुलै रोजी परिपत्रक काढत तीनदिवसाआड पाणी पुरवठ्याचा प्रयोग चालू असल्याचे सांगण्यात आले. शहराच्या 40 टक्के भागाला तीनदिवसाआड पाणी पुरवठा केला आहे. 5 जुलै पासूनतीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे जाहिर केल्याने शहवासियांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
समांतर जलवाहिनीद्वारे पाणी उपसा होणार्या पाण्यावर प्रायोगिक तत्वावर शहराच्या मध्यवर्ती भागातील सिव्हील हॉस्पिटलच्या पाठीमागे 30 जुनपासून तीन दिवसाआड केला आहे. उजनीतून थेट पाईपलाईनद्वारे होणारा पाणीपुरवठा दि. 1 जुुलैपासून तीन दिवसाआड करण्यात आलेला आहे. भवानीपेठ जलशुध्दीकरण केंद्रावरुन अवलंबून असलेल्या फक्त कस्तुरबा व दयानंद टाकी परिसरात पाच जुलैपासून तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे. शहरातील 40 टक्के भागात तीन दिवसाआड प्रमाणे प्रायोगिक तत्वावर पाणी पुरवठा करण्याचे नियोजन पाणी पुरवठा विभागाकडून करणेत आलेले आहे. असे या परिपत्रकामध्ये म्हटले आहे.