

बार्शी : शेतातील पेरणी करायला का येत नाही या कारणावरून चिडून दोघांनी मिळून ट्रॅक्टर चालकासह त्याच्या भावाला कुऱ्हाडीचा दांडा, स्कु ड्राईव्ह, लोखंडी पाईपने बदडत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार तालुक्यातील भानसाळे येथे आज रविवारी सकाळी घडला.
माणिक नागनाथ पाटील व अमोल नागनाथ पाटील (दोघे रा. भानसाळे) अशी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जखमी गणेश विक्रम हिरे (रा. भानसाळे) यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल दि. 18 ऑक्टोबर रोजी माणिक नागनाथ पाटील व अमोल नागनाथ पाटील यांच्या शेतात ज्वारीचे बी पेरणीसाठी ट्रॅक्टर पेरणीकरीता घेऊन गेले होते. ज्वारीच्या बियांची पेरणी व्यवस्थित होत नसल्याने पेरणीचे ट्रॅक्टर घेऊन परत ते घरी गेले. आज दि. 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळच्या सुमारास माणिक पाटील व अमोल पाटील हे आले. दुसरीकडे काम असल्याने पेरणीस येता येणार नाही, असे सांगताच दोघांनी कुऱ्हाडीच्या दांड्यांने डाव्या हाताच्या बोटावर मारुन जखमी केले. माणिकने स्क्रूड्राईव्हर व लोखंडी पाईपने मला व भाऊ प्रशांत यास मारुन जखमी केले. अधिक तपास हवालदार अरुण डूकळे करत आहेत.