

पंढरपूर : करकंब येथील सोमवार पेठ, रोजा गल्लीतील सिमेंटपत्र्याच्या शेडमध्ये शहाजी वसंत शिंदे, विजय बाबुराव बंजारी हे अवैधरीत्या जुगार अड्डा चालवत होते. पोलिसांनी छापा टाकून त्यांच्याकडून बेकायदेशीररीत्या देशी दारूच्या बाटल्या व 14 व्यक्तींसोबत 52 पानी पत्यांच्या जुगारावर पैसे लावून खेळत असताना डीवायएसपी प्रशांत डगळे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
पोलिसांनी दुचाकी वाहने, मोबाईल, रोख रक्कम, 52 पानी पत्याचे डाव, त्यामध्ये रोख रक्कम 41,430 रुपये, 14 मोबाईल फोन 1,20,000, 7 मोटारसायकल 3,90,000, देशी दारु 72,192 रुपये असा एकूण 6,23,622 रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याबाबत करकंब पोलीस ठाण्यात 15 इसमांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5 प्रमाणे व विजय बाबुराव वंजारी याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगीरी सहा पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नीलेश गायकवाड, पो.ह. नीलेश रोंगे, पोह सातव, पोकों हुलजंती, लोंढे, कांबळे, अजित जाधव, मपोकों माने यांनी पार पाडली आहे.