

सोलापूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनी 1 ऑगस्टपासून भारतातून आयात होणार्या वस्तूंवर 25 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. यांचा परिणाम भारतीय उद्योग आणि शेती क्षेत्रावर होणार आहे. यांच्या निषेर्धात बुधवार दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने आंदोलन करत डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा जाळला यावेळी पुतळा ताब्यात घेण्यासाठी पोलिस आणि कार्यकर्त्यामध्ये झटापट झाली.
रशियाकडून भारत तेल व शस्त्रास्त्रे विकत घेत असल्याने ती खरेदी थांबवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. अन्यथा, 27 ऑगस्टपासून आणखी 25 टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. या कृतीतून अमेरिकन साम्राज्यवादाचा कुरूप चेहरा उघड झाला आहे. टेरिफ करामुळे सोलापूर शहरातील मुख्य उत्पादन चादर व टॉवेल्स निर्यातीस बंदी असल्याने अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुुळे हे आंदोलन करण्यात आले. सिटूचे राज्य उपाध्यक्ष कॉ. युसुफ शेख (मेजर) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे टेरिफ कराच्या निषेधार्थ आक्रमक धरणे आंदोलन व अमेरिकन साम्राज्यवादाचा प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आला. यावेळी कॉ. नलिनीताई कलबुर्गी, नसीमा शेख, अॅड. अनिल वासम, दत्ता चव्हाण, शेवंताताई देशमुख, सुनंदा बल्ला, व्यंकटेश कोंगारी उपस्थित होते.