सोलापूर: पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला सोलापूर जिल्ह्यासह राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता चांदापुरी (ता. माळशिरस) येथील एका तरुणाने संबंधित अर्जावर मुलीचा फोटो वापरुन व नावात फेरफार करुन अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चांदापुरी येथील सुनील वाघमोडे याच्याविरोधात तक्रार दिली आहे. (Ladkya Bahin Yojana)
मागील काही काळापासून जिल्ह्यातील विविध भागातील तरुण मुलींचा फोटो वापरुन मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करत असल्याचे प्रकार घडत असल्याची तक्रार बालविकास प्रकल्प अधिकार्यांकडे केली जात होती. त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी आलेल्या प्रत्येक अर्जाची छाननी काटेकोरपणे करण्यात येत आहे.
लाडक्या बहिण योजनेसाठी मुलाने अर्ज केल्याची माहिती समोर येताच बालविकास प्रकल्प अधिकार्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी तत्काळ सुनील वाघमोडे याचा शोध घेतला. त्यावेळी वाघमोडे यांनी माझ्याकडून चुक झाली. यापुढे अशी चूक करणार नसल्याचे सांगून माफी मागितली. (Ladkya Bahin Yojana)