

सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक 55 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. 20) सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.
केगाव जवळील एमजी हेक्टर शोरुम समोर अपघात झाल्याची माहिती फौजदार चावडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरील ठिकाणी पोलीस गेले असता, 55 वर्षीय इसमाचा मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.