

सोलापूर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह शंभर अधिकारी जिल्ह्यातील विविध गावांत आज बुधवारी (दि.15) मुक्काम करणार आहेत. तसेच दुसऱ्या दिवशी प्रभातफेरी, महाश्रमदान करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जनजागृती करणार आहेत.
ग्रामीण भागातील पंचायतराज संस्था अधिक सक्षम, स्वयंपूर्ण आणि जनसहभागी बनविण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केले आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचा प्रथम क्रमांक यावा, या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी काम सुरू केले आहे. बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम, सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, तालुकास्तरीय सर्व विभागप्रमुख जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायतींमध्ये मुक्काम करणार आहेत.