

पंढरपूर : आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि. 6 जुलै रोजी साजरा होत आहे. या यात्रेत येणार्या शेकडो दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तीसागर (65 एकर) येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याठिकाणी मोफत प्लॉट्स भाविकांना तंबू, राहुट्या उभारुन वास्तव्य करण्यासाठी देण्यात येत आहेत. प्रथम येणार्या पालखी, दिंडीधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. येथे प्लॉटची दि.16 जून पासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मंगळवार, दि. 1 जुलै रोजी 321 दिंडी पालखी धारकांनी जागेसाठी अर्ज केले आहेत. तर 285 प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. आणखी दिंडी व पालखी धारक जागा मागणीसाठी अर्ज करताना दिसून येत आहेत.
आषाढी यात्रेला येणार्या पालखी सोहळ्यासोबत येणार्या दिंड्यांमधील भाविकांच्या निवार्याची सोय भक्तीसागर (65 एकर) येथे करण्यात आलेली आहे. याठिकाणी भाविकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपत्कालीन मदत केंद्र स्थापन करण्यात येते. येथे प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज व सुरळीतपणे काम करण्यासाठी तहसीलदार सचिन मुळीक यांची सेक्टर मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे. भाविकांना प्लॉट्स वाटप करणे, अडीअडचणी सोडवणे, आपत्कालीन प्रतिसाद केंद्र व त्यावर नियुक्त सेक्टर मॅनेजर व त्याचे अधिनस्त कर्मचारी कार्यान्वित आहेत.
दिंडी, पालखीसमवेत येणार्या भाविकांना भक्तीसागर 65 एकर येथे प्लॉट्सचे वाटप करण्यात येत आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पालख्या, दिंड्या पंढरपूरच्या जवळ आल्या आहेत. त्यामुळे दिंडी व पालखी धारक जागेसाठी अर्ज करताना दिसून येत आहेत. भक्तीसागर याठिकाणी भाविकांना मुलभूत सेवासुविधा पुरवण्यात येत आहेत. आपत्कालीन प्रतिसाद केंद्रातून भाविकांना सेवा देण्यात येत आहे.
प्लॉटसाठी यांच्याशी संपर्क करावा-
आषाढी यात्रेला येणार्या पालखी सोहळ्यासोबत येणार्या दिंड्यांमधील भाविकांच्या निवार्याची सोय भक्तीसागर (65 एकर) येथे करण्यात आलेली आहे. येथे मोफत प्लॉट मिळवण्यासाठी नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे (मो.क्र.9767248210), ग्राम महसूल अधिकारी दादासाहेब पाटोळे (मो.क्र.9970109919), प्रमोद खंडागळे (मो.क्र. 9657290403), वैभव कट्टे (मो.क्र.9665076066) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.