करमाळा : दोन आमदारांनी लाडक्या बहिणींना ओवाळणीची रक्कम माघारी घेण्याची धमकी दिली. त्या दोन्ही आमदारांना माझे आव्हान आहे की, त्यांनी पैसे घेऊन दाखवावे, असा सज्जड दम खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
खासदार सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाच्या करमाळा माढा विधानसभा मतदारसंघात अथर्व मंगल कार्यालयामध्ये शिवस्वराज्य यात्रेतील सभेत बोलत होत्या. यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पंडित कांबळे, माजी आमदार नारायण पाटील, सुभाष गुळवे, संभाजी गायकवाड, सोनल शिवपुरे, संजय पाटील-घाटणेकर ऋतुजा सुर्वे, आप्पासाहेब झांजुर्णे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
खा. सुळे पुढे म्हणाल्या की, हे सरकार जुवेबाज व जुमलेबाज सरकार आहे. ज्याच्या मागे ईडी लावली, ज्याच्यावर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप केले अशांना सत्तेत घेऊन मांडीला मांडी लावून बसले आहेत.
यावेळी खा. डॉ अमोल कोल्हे यांनी महायुतीच्या सरकारवर टीका करताना प्रत्येक जन्मलेल्या बाळाच्या डोक्यावर 65 हजार रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले. यावेळी संतोष वारे, खा. धैर्यशील मोहिते पाटील प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, पंडित काबळे, सुभाष गुळवे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळीड शहानुर सय्यद, नलिनी जाधव, विजयमाला चवरे, राजश्री कांबळे, सभापती अतुल पाटील माजी सभापती शेखर गाडे, माजी संचालक देवानंद बागल, भावना गांधी, मुस्तकीम पठाण, आमीर ताबोळी संतोष वारे, नगरसेवक अल्ताफ तांबोळी, केशव चोपडे, पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक सुनील तळेकर यांनी केले. सूत्रसंचालन गरड यांनी केले. सुनील तळेकर यांनी आभार मानले.
भरसभेत खा. सुळे यांनी वडनेरचे आमदार रवी राणा व आमदार महेश शिंदे यांनी लाडक्या बहिणीला दिलेल्या धमक्यांसंदर्भातचे रेकॉर्डिंग ऐकवून या सर्व फसव्या योजना फक्त तीन महिन्यांसाठी आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींसह सर्वांनीच जागे व्हावे, असे आवाहन केले.