Indian Postal Service : टपाल घेण्यासाठीही पोस्टमन येणार घरी

नवी सोयी-सुविधा देशातील काही निवडक शहरांत सुरू ; हळूहळू सुविधा देशातील अन्य शहरांत सुरू होईल
Indian Postal Service
टपाल घेण्यासाठीही पोस्टमन येणार घरीpudhari photo
Published on
Updated on

सोलापूर ः आमसिद्ध व्हनकोरे

आजपर्यंत पोस्टमन काका घराच्या दारापर्यंत टपाल व मनिऑर्डरसह अन्य पत्रे आणून देत होता. आता, यापुढील काळात मात्र तो तुमच्या घराच्या दारातूनही टपाल घेऊन जाईल. तसेच, पार्सल, स्पीड पोस्टासह अन्य गोष्टी थेट घराच्या दारातून त्याच्याकडून स्वीकारले जाणार आहेत. ही नवी सोयी-सुविधा देशातील काही निवडक शहरांत सुरू झाली आहे. नंतर ती आता हळूहळू सुविधा देशातील अन्य शहरांत सुरू होईल.

दरम्यान, दिल्ली, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमधील काही शहरे, जोधपूर (राजस्थान), हैदराबादसह प्रतापगड (उत्तर प्रदेश) यासह अन्य काही शहरांमध्ये सुरू झाली असून, लवकरच अन्य मोठ्या शहरांत ती सुरू केली जाणार आहे. एखादी वस्तू 500 रुपयांपेक्षा कमी किमतीची असेल, तर टपालवाहक (पोस्टमन) फक्त 50 रुपये सेवा शुल्क आकारणार आहे. त्यापेक्षा जास्त आर्टिकल्ससाठी शुल्कच आकारले जाणार नाही. पोष्ट विभागाच्या या नव्या धोरणात्मक निर्णयामुळे पोस्ट विभागाकडून खासगी कुरिअर कंपन्यांना थेट स्पर्धा होेणार आहे. पोस्ट विभाग नवनवीन तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करताना दिसत आहे. अ‍ॅडव्हान्स्ड पोस्टल तंत्राचे नवे प्रोग्राम (सॉफ्टवेअर) प्रणाली सुरू केली आहे.

Indian Postal Service
Solapur Rain: अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव वाहून गेला

कुरिअरला स्पर्धा

नव्या सेवेची सुविधा ही रविवारसह अन्य सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ती उपलब्ध असणार नाही. या नव्या सुविधेचा डाक विभाग अन्य खासगी कुरिअर कंपन्यांना थेट टक्कर देणार आहे.

संकेतस्थळावर नोेंदणी

पोस्ट विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन यासाठी नोंदणी करावी लागेल. मुख्य पृष्ठभागावर ‘ऑनलाईन सर्व्हिस’ निवडावे लागेल. वैशिष्ट्यकृत ‘फीचर्ड’ व यानंतर ‘सेल्फ सर्व्हिस पोर्टल’ वर जावे लागेल.

Indian Postal Service
Indian Postal Service: जागतिक पातळीवर भारतीय टपाल सेवेचे दर्जेदार जाळे

घरातूनही नोेंदणी

पोर्टलवर नोंदणी झाल्यावर नागरिकांचा ग्राहक आयडीसह लॉगिन पासवर्ड तयार होतो. यावरून घरात बसून नोंदणी करता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news