सांगोला : पुढारी वृत्तसेवा हॅलो ताई नमस्कार... मी तुमचा दादा बोलतोय, अमुक तमुक योजनेच्या माध्यमातून तुम्ही लाभ घेतला. त्याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होत असेल, अशा स्वरूपाचा फोन तुम्हाला आला, तर घाबरून जाऊ नका. अशा स्वरूपाचे रेकॉर्डिंग फोन कॉल करून मतदारांना भुरळ घालण्याचे काम राजकीय पक्षांकडून सुरू झाले आहे. नेत्यांचा कॉल संपताच संबंधित व्यक्तीच्या व्हॉटस्अॅपवरही मेसेज येतात. यावरून निवडणुकीत उमेदवारांनी हायटेक प्रचाराच्या मुद्द्यामध्ये सोशल मीडियाचा नेत्यांचा कॉल संपताच संबंधित व्यक्तीच्या व्हॉटस्अॅपवरही मेसेज येतात. यावरून निवडणुकीत उमेदवारांनी हायटेक प्रचाराच्या मुद्द्यामध्ये सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर होत असला, तरी मेसेजचा पॅकच नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे सकाळ, संध्याकाळ मेसेज मोबाईलवर येऊन धडकतात, सण, उत्सवाच्या शुभेच्छा जयंती दिनविशेष असेल, त्याचेही संदेश मतदारांना पोचविले जात आहेत. या हायटेक प्रचारावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते.
निवडणुकीत प्रचाराचा कुठला मुद्दा कधी 'व्हायरल' होईल, हे काही सांगता येत नाही. राजकीय वातावरण बघूनच नेतेही या पक्षातून त्या पक्षात उडी मारतात. त्यामुळे जवळपास सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे. शासनाच्या सर्वच योजनांचा लाभ घेताना सादर केलेल्या मोबाईल क्रमांकावर या नेत्यांचे फोन येऊ लागले आहेत. नमस्कार ताई, मी तुमचा दादा बोलतो. तुम्ही 'या' योजनेचा लाभ घेतला, तुम्हाला आर्थिक हातभार लावण्याची संधी आम्हाला मिळाल्याचा आनंद होत असल्याचे तोंडभरून कौतुक केले जाते. रेकॉर्ड केलेला फोन संपताच संबंधित व्यक्तीच्या व्हॉटस्अॅपवर एक मेसेज येतो. बदलत्या काळानुसार प्रचाराचा हा हायटेक फंडा वापरला जात जात आहे. तर दुसरीकडे प्रचाराचे विविध फंडेही वापरले जात आहेत.
राज्य शासनाने वेगवेगळ्या घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना आणल्या. काहींची अंमलबजावणी झाली. काही कागदावरच राहिल्या. पण नवनिर्वाचित चर्चेत राहिलेल्या योजनांचा महिलांना विसर पडू नये, याची काळजी जणू नेतेमंडळी घेत आहेत. सध्या सर्वच नेतेमंडळींकडून हायटेक प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. तालुक्यातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी उमेदवारांचे आवाजातील रेकॉर्डिंग मतदारापर्यंत पोहोचवली जात आहे.