सोलापूर : चेन्नई-मुंबई एक्स्प्रेसच्या घातपाताचा कट उधळला

रुळावर ठेवला सिमेंटचा खांब; 19 दिवसांतील दुसरी घटना
A cement pillar placed by an unknown person on the railway track
रेल्वेरुळावर अज्ञाताकडून ठेवण्यात आलेला सिमेंटचा खांबPudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

सोलापूर-कुर्डूवाडी रेल्वे मार्गावर फॉलिंग मार्क असे लिहिलेला सिमेंटचा खांब ठेवल्याची घटना 22 सप्टेंबरच्या रात्री अकराच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, लोको पायलट, लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे चेन्नई-मुंबई एक्स्प्रेसचा घातपाताचा कट उधळला गेला. 19 दिवसांच्या काळात अशापद्धतीने रेल्वेरुळावर अडथळा निर्माण करण्याची ही दुसरी घटना समोर आली आहे. चेन्नई-मुंबई एक्स्प्रेस वेगाने धावत होती. कुर्डूवाडीजवळ येताच रुळावर काहीतरी असल्याचे लोको पायलटच्या अंधूकसे निदर्शनास आले. तेव्हा गाडीची गती कमी करून जवळून पाहिले असता, फॉलिंग मार्क असे लिहिलेला काँक्रिट स्लिपर रेल्वे रुळावर ठेवल्याचे स्पष्ट झाले.

A cement pillar placed by an unknown person on the railway track
मुंबई : मेल-एक्स्प्रेसच्या जेवणावर प्रवाशांच्या उड्या

या प्रकाराची माहिती लोको पायलटने सुरक्षा दल, वरिष्ठ अधिकारी, लोहमार्ग पोलीस, गुप्तचर शाखा यांना ताबडतोब दिली. त्यानंतर संबंधित अधिकारी त्वरित घटनास्थळी आले. त्यांनी अडथळा दूर केला आणि रेल्वे वाहतूक सुरळीत केली. वेळीच अडथळ्याची माहिती मिळाल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेची लोहमार्ग पोलिसांसह वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दाखल घेतली आहे. याप्रकरणी कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A cement pillar placed by an unknown person on the railway track
खडकीत ‘दी बर्निंग ट्रेन’; मुंबई-चेन्नई यात्रा स्पेशल ट्रेनच्या दोन डब्यांना आग

प्रवाशांची सुरक्षा धोक्यात यापूर्वीही म्हणजे 19 दिवस अगोदर

चार सप्टेंबरच्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारासही अशाच प्रकारची घटना कुर्डूवाडी रेल्वे स्थानकाच्या 50 मीटर अंतरावर उघडकीस आली होती. या प्रकारात वाढ होत असल्याने प्रवाशांसह रेल्वेची सुरक्षा धोक्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news