

सोलापूर : येथील विभागीय जात पडताळणी समितीने मागील 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांकरिता जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कडून शैक्षणिक पडताळणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
राज्यघटनेच्या अनुच्छेद 46 अन्वये घटनेने समाजातील दुर्बल व वंचितांसाठी राज्याची जबाबदारी नमूद केली आहे. त्या अनुषंगाने मागासवर्गीय घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती जनतेला व्हावी व महामानव आणि राष्ट्रपुरुष यांचे विचार व कार्याची प्रसिद्धी व्हावी. यासाठी शासनाकडून सेवा पंधरवडा घेण्यात आला.
या सेवा पंधरवड्याच्या कालावधीत जिल्ह्यातील 11 वी व 12 वीच्या विज्ञान व तांत्रिक शाखेतील प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्रुटी पूर्ततेअभावी प्रलंबित विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबविली, त्रुटीच्या पूर्तते अभावी जे प्रकरण प्रलंबित आहेत. अशा प्रस्तावकांना ईमेल द्वारे कळवत त्रुटींची पूर्तता केली नसेल ते करावी. तसेच, त्रुटी पूर्ततेसाठी कॅम्पचे आयोजन केले. या यादरम्यान मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणांची निकाली काढण्यासाठी तसेच ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणार्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी संबंधित महाविद्यालयात समान संधी केंद्रामार्फत वेबिनार घेण्यात आले.
पंधरा दिवसांच्या या कालावधीत विविध योजनांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी सेवा पंधरवडा सादर करण्याबाबत विशेष आयोेजन करण्यात आले. मागासवर्गियांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या योजना शासनाकडून राबविण्यात येतात, त्यावरही जागृती साधली गेली.