सोलापूर : राज्य शासनाच्या 2024 च्या निर्णयानुसार धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा मीटर्ड व टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळाची स्थापना झाली. या मंडळाकडून येथील शहर व जिल्ह्यातील ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांसाठी सुध्दा विविध कल्याणकारी योजनांचा या मंडळाच्या माध्यमातून लाभ देण्यात येत आहे.
या मंडळाच्या माध्यमातून वयाची 65 वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी सन्मान निधी योजना, आरोग्य लाभ योजना, कामगार कौशल्य वृद्धी योजना, रिक्षा किवा टॅक्सी चालवतांना जीवन विमा यासह अपंगत्वाचा विमा, दुखापती झाल्यास अर्थसाह्य, तसेच त्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्तीसह अन्य योजनांचा यात समावेश केला आहे. अर्जाच्या नोंदणीसह ओळखपत्र शुल्क म्हणून 500 रुपये व सभासद शुल्क म्हणून 300 रूपयेचा दर हा शासनानेच निश्चित केला आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला संपर्क साधावा.