सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पावसाचे कारण देत राज्यातील २४ हजार ७१० सहकारी संस्थेच्या निवडणुका पुढे ढकल्याचा निर्णय गुरूवारी (दि.२०) सहकार, पणव व वस्त्रोद्योग विभागाने घेतला त्यामुळे सहकारी संस्थेच्या निवडणुका तीन महिने पुढे गेल्या आहेत.
राज्यातील सहकारी संस्थेच्या निवडणुकांबाबत ठळक मुद्दे
राज्यातील १४ जिल्ह्यात १०० टक्क्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे. तर पाच जिल्ह्यात ७० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक शेतकरी, सभासद हे खरीप हंगामातील पेरणीसाठी व्यस्त आहेत. शेतकरी, सभासदांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येत नाही, हे कारण देत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने सहकारी संस्थेच्या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ क मधील तरतुदीनुसार पावसाळी हंगामात सहकारी संस्थांची निवडणूक पुढे ढकलण्याचा अधिकार शासनास आहे. त्यामुळे पणन विभागाने तीन महिन्यांसाठी सहकारी संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलेल्या आहेत.
हेही वाचा :