कोरोनाबाधितांची संख्या सोलापूर जिल्ह्यात पुन्हा वाढली | पुढारी

कोरोनाबाधितांची संख्या सोलापूर जिल्ह्यात पुन्हा वाढली

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मंगळवारी आकडेवारीनुसार जिल्ह्यामध्ये 535 बाधितांची नोंद झाली. यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये तब्बल दोनशे बाधितांची नोंद झाली. जिल्ह्यातील चौघांचा कोरोना मुळे मृत्यू झाला. शहरामध्ये एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. एकूण 262 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, माढा आणि सांगोला या तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कायम राहत आहे. माळशिरस दोनशे, सांगोला 80, पंढरपूर तालुक्यामध्ये 79 बाधितांची तर सांगोला तालुक्यामध्ये 80 बाधितांची नोंद झाली. गेल्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये या भागामध्ये सातत्याने कोरोना बाधितांची संख्या कायम राहत आहे.

जिल्ह्यातील 9 हजार 404 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 8 हजार 888 जणांचे रिपोेर्ट हे निगेटिव्ह आले, तर 516 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले. उपचार घेवून बरे झालेल्या ग्रामीण भागातील 262 जणांना घरी सोडण्यात आले. अजूनही दोन हजार 681 कोरोना बाधितांवर विविध रूग्णालयामध्ये उपचार चालू आहेत.

शहरामध्ये 19 कोरोनाबाधितांची नोंद झाली. शहरातील बाधित रूग्णाची संख्या ही सातत्याने कमी राहत आहे. 925 जणांच्या तपासणीमध्ये 19 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह तर एक हजार 906 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. शहरातील 108 कोरोना बाधितांवर विविध रूग्णालयामध्ये उपचार सुरू असून उपचार घेवून बरे झालेल्या 9 जणांना घरी पाठवण्यात आले आले.

Back to top button