सोलापूर : चांद्रयान-३ मोहीम यशस्वी होण्यासाठी भाजपच्या वतीने सिद्धरामेश्वरांची महाआरती

सोलापूर : चांद्रयान-३ मोहीम यशस्वी होण्यासाठी भाजपच्या वतीने सिद्धरामेश्वरांची महाआरती
Published on
Updated on

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : चांद्रयान-३ मोहीम यशस्वी होण्यासाठी भाजपच्या वतीने ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची महाआरती करून प्रार्थना करण्यात आली. यावेळी भारत मातेच्या व शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदमून गेला होता. हम होंगे कामयाब, मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है, असे लिहिलेले पोस्टर कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व इस्रोच्या वैज्ञानिकांच्या परिश्रमाला यश मिळो यासह 'कोशीश करणेवालो की कभी हार नहीं होती' ही कविता लिहिलेले पोस्टर्स सर्वांना आकर्षित करत होते.

याप्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे, माजी स्थायी समिती सभापती जगदीश पाटील, प्रा. गजानन धरणे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, मंडल अध्यक्ष महेश देवकर, नगरसेवक अमित पाटील, संपदा जोशी, अमर अण्णा बिराजदार, यतीराज होनमाने, प्रभाकर पडवळकर, आनंद बिराजदार, दत्ता नडगिरी, सतीश पारेली, संदीप काशीद, अरविंद गवळी, गायकवाड विशाल, अंबादास जाधव, श्रीशैल स्वामी, अमित पाटील, परमेश्वर माळगे, श्रीनिवास बुरुडकर, राहुल वाघमोडे, सोमनाथ केंगनालकर, विशाल बनसोडे, भीमाशंकर पदमगोंडा, महेश अगरगुंडगी, डोंगरेश चाबुस्कवार, सतीश पारेली यांच्यासह मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news