सोलापूर : खोटा चेक देणार्‍यास दोन महिन्यांची शिक्षा | पुढारी

सोलापूर : खोटा चेक देणार्‍यास दोन महिन्यांची शिक्षा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : बँक खात्यात रक्कम नसतानाही खोटा चेक देणार्‍यास न्यायदंडाधिकारी नम्रता बिराजदार यांनी दोन महिने शिक्षा व तीन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.

विजय रावसाहेब मोरे (रा. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत सत्यम शाम दुधनकर (रा. सोलापूर) यांनी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. दुधनकर व मोरे हे मित्र आहेत. विजय मोरे यांनी व्यवसायासाठी एक लाख 50 हजार रुपये दुधनकर यांना हातऊसने मागितले होते. त्यापोटी मोरे यांनी एक लाख 50 रुपयांचा चेक दिला होता. हा चेक खात्यावर भरल्यानंतर खात्यात रक्कम शिल्लक नाही म्हणून न वटता परत आला. त्यामुळे दुधनकर यांनी मोरे यांना वकिलामार्फत नोटीस पाठविली होती. तरीही मोरे यांनी मुदतीत रक्कम दिली नाही म्हणून दुधनकर यांनी न्यायालयात फौजदारी फिर्याद दाखल केली होती.

चौकशीअंती आरोपी मोरे यांना न्यायदंडाधिकारी बिरादार यांनी दोन महिने शिक्षा व तीन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच नुकसानभरपाईची रक्कम न दिल्यास आणखीन एक महिन्याची शिक्षा व दाव्याचा खर्च म्हणून पाच हजार रुपये व ही रक्कम न भरल्यास आठ दिवसांची शिक्षा सुनावली. याप्रकरणी दुधनकर यांच्यातर्फे अ‍ॅड. एस. आर. खमितकर, अ‍ॅड. सुनीता नाईक (नरोटे) यांनी, तर मोरे यांच्यातर्फे अ‍ॅड. नीलेश ठोकडे यांनी काम पाहिले.

Back to top button