सांगोल्यात २२ जानेवारीपासून अंबिका देवी यात्रा | पुढारी

सांगोल्यात २२ जानेवारीपासून अंबिका देवी यात्रा

सांगोला; पुढारी वृत्तसेवा :  श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती, सांगोला यांच्या वतीने आयोजित केलेल्या श्री अंबिकादेवी यात्रेस रविवार, दि. २२ पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार असून ३१ जानेवारी रोजी शोभेच्या दारूकामाने यात्रेची सांगता करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीमध्ये शेतीमालाचे प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती कोर्ट रिसिव्हर्स अॅड. सारंग वांगीकर, अॅड. शिवनाथ भस्मे, अॅड. राजेंद्र चव्हाण, अॅड. संजीव शिंदे यांनी दिली.

१८, १९ रोजी सकाळी १० ते २ व दुपारी ४ ते ६ वेळेत मार्केट वार्ड पटांगणामध्ये इतर व्यवसायाची जागा वाटप होणार आहे. शुक्रवार २० रोजी मंदिर परिसरातील जागा वाटप करण्यात येणार आहे. रविवार २२ रोजी सायं. ५ वाजता श्री. देवीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

सोमवार २३ व दि. २४ रोजी शेळ्या मेंढ्या व सर्वप्रकारचा बाजार भरणार आहे. बुधवार २५ गुरुवार २६, शुक्रवार २७ रोजी सर्व प्रकारचा बाजार व नोंदी होणार आहेत. शनिवार २८ रोजी रथामी महापूजा, महानैवेद्य व रात्री ९ वा. भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रविवार २९ रोजी सकाळी १० वाजता शेतीमालाची निवड करण्यात येणार आहे. सोमवार ३० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मंगळवार ३१ जानेवारी रोजी सायं. ५ वाजता बक्षीस समारंभ सायं. ७ वाजता शोभेच्या दारूकामाने बानी सांगता करण्यात येणार आहे.
शुक्रवार, २७ रोजी सकाळी १० बा. ५ वी ते ७ वी गटासाठी व ८ वी ते १० बी गटासाठी ठिपक्याची रांगोळी तर खुला गटासाठी संस्कार भारती स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. तसेच रांगोळी, रंगभरण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पारितोषिक देण्यात येणार आहे. शनिवार, २८ रोजी सकाळी ७ बा. १७ वर्षांखालील मुलासाठी मिनी मैरेथॉन स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागींना पारितोषिक देण्यात येणार आहे.

यात्रा कालावधीमध्ये विविध भजनी मंडळाकडून भजनसेवा होणार आहे. अधिक माहितीसाठी अॅड. सारंगगी, अॅड. शिवनाथ भस्मे, अॅड. राजेंद्र चव्हाण, ॲड. संजीव शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button