सांगलीचे दोघे शेळगावात ट्रक-कार अपघातात ठार

सांगलीचे दोघे शेळगावात ट्रक-कार अपघातात ठार
Published on
Updated on

वैराग : पुढारी वृत्तसेवा :  बार्शी-सोलापूर रस्त्यावर गुरुवारी पहाटे ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात सांगलीतील कारमधील दोघे जागीच ठार झाले. रघुनाथ भगवान डोरले, अमित अशोक कोथळे (रा. भारतनगर, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. प्रताप शंकर देशमुख हे जखमी झाले आहेत. मृत अमित कोथळे हा सांगलीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या अनिकेत कोथळे याचा भाऊ होता.

याबाबतची माहिती अशी की, सांगलीहून कारने रघुनाथ, अमित, प्रताप हे तिघे बार्शी परिसरातील एका गावामध्ये लग्नासाठी गेले होते. लग्न उरकून कारमधून (एम. एच. १२, एल. जे. ७०४५) सांगलीकडे परतत होते. गुरुवारी पहाटे वैराजवळील शेळगाव येथे आले असता सोलापूरहून शेळगावमार्गे धामणगावकडे जाणाऱ्या ट्रकची (एम. एच. ११. ए. एल. ७००९) समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यामध्ये अमित व रघुनाथ हे जागीच ठार झाले. प्रताप देशमुख हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सोलापूर येथील खासगी रूणालयात त्यांचे उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news