सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव उत्साहात; या महाविद्यालयांनी मिळवले विजेतेपद | पुढारी

सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव उत्साहात; या महाविद्यालयांनी मिळवले विजेतेपद

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठाचा मंगळवेढा येथे दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्याल येथे १८ वा युवा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. युवा महोत्‍सवाचे बुधवारी पारितोषिक वितरण पार पडले. या महोत्‍सवास सिने अभिनेत्री सैराट फेम रिंकू राजगुरू आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. कुलसचिव योगिनी घारे, संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुजित कदम, वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शहा, तेजस्विनी कदम, प्रियदर्शनी महाडिक, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ कळवणे, डॉ गुणवंत सरवदे आदी मान्यवर उपस्‍थित होते.

१८ व्या युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम पारितोषक 91 गुणांसह बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने पटकावले. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद 50 गुणांसह संगमेश्वर कॉलेज तर 49 गुण घेऊन अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाने तिसरे पारितोषिक मिळविले.

ललित, वांग्मय, नाट्य या तिन्ही विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने पटकावले. नृत्य विभागाचे पारितोषिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभागास मिळाला. संगीत विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद दयानंद कॉलेजला मिळाले.

गोल्डन गर्ल आणि गोल्डन बॉय 

युवा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थांमधून गोल्डन गर्ल आणि गोल्डन बॉय असा किताब देण्यात येतो. यंदाच्या गोल्डन गर्लची मानकरी सांगोला कॉलेज सांगोला मधील तृप्ती बेंगलोरकर तर गोल्डन बॉय हा किताब बार्शीच्या शिवाजी कॉलेज मधील सुरज काळे यांना मिळाला.

विविध कलाप्रकारांचे निकाल : पाच सर्वसाधारण फिरते चषक

पहिला ललित -श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी 19 गुण, दुसरा वाड:मय – श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी 20 गुण, तिसरा नाट्य – श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी 42 गुण, चौथा नृत्य- पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ आधीविभाग सोलापूर 10 गुण, तर पाचवा संगीत- डी बी एफ दयानंद महाविद्यालय 16 गुणने चषक मिळाले आहे.

सर्वसाधारण चषक विजेते 

प्रथम पारितोषिक क्रमांक श्री शिवाजी महाविद्यालय 91 गुण, द्वितीय संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर 50 गुण, तृतीय पारितोषिक शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज 49 गुण मिळवून चषक पटकावले.

रांगोळी स्पर्धा विजेते 

प्रथम क्रमांक पटकावला आहे शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, द्वितीय क्रमांक विभागून कॉलेज ऑफ इंजीनियरिंग गोपाळपूर पंढरपूर, आणि वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर यांनी पटकावले आहे.

कातर काम विजेते 

प्रथम पारितोषिक कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर, तर द्वितीय पारितोषिक मानदेश महाविद्यालय जुनोनी, आणि तृतीय पारितोषिक संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर यांनी पटकावले आहे.

मातीकाम विजेते 

प्रथम पारितोषिक विभागून श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी आणि सांगोला महाविद्यालय सांगोला तर द्वितीय पारितोषिक उमा महाविद्यालय पंढरपूर आणि प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय. तृतीय पारितोषिक शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज व वालचंद व कला शास्त्र सोलापूर , आणि कॉलेज ऑफ फार्मसी अकलूज यांनी पटकावले आहे.

व्यंगचित्र विजेते 

प्रथम पारितोषिक मानकरी डी बी एफ दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर. तर द्वितीय पारितोषिक मानदेश महाविद्यालय जुनोनी. तृतीय पारितोषिक शंकराव मोहिते महाविद्यालय अकलूज आणि शिवाजी महाविद्यालय बार्शी यांनी पटकावले आहे.

भितीचित्रण विजेते 

प्रथम पारितोषिक संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर. द्वितीय पारितोषिक शंकरराव मोहिते महाविद्यालय आणि डीजीपी दयानंद लॉ कॉलेज सोलापूर. तर तृतीय पारितोषिक वालचंद कला व शास्त्र सोलापूर आणि डी बी एफ दयानंद कला व शास्त्र सोलापूर यांनी पटकावले आहे.

स्थळचित्रण विजेते 

प्रथम पारितोषिक शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज. द्वितीय पारितोषिक संगमेश्वर कॉलेज सोलापूर वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर तर तृतीय पारितोषिक श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी आणि डी बी एफ दयानंद कला महाविद्यालय सोलापूर यांनी पटकावले आहे.

स्पोर्ट फोटोग्राफी विजेते 

प्रथम पारितोषिक श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, द्वितीय पारितोषिक संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर आणि डी ए व्ही वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स. तर तृतीय पारितोषिक श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा आणि डीजीबी दयानंद लॉ कॉलेज सोलापूर यांनी पटकावले आहे.

निर्मिती चित्र विजेते 

प्रथम पारितोषिक श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, द्वितीय पारितोषिक कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय आणि डी बी एफ दयानंद महाविद्यालय आणि सांगोला महाविद्यालय सांगोला. तर तृतीय पारितोषिक संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर आणि कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन व वसुंधरा कला महाविद्यालय सोलापूर यांनी पटकावले आहे.

वकृत्व मराठी विजेते 

प्रथम पारितोषिक संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर, द्वितीय कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन तर तृतीय पारितोषिक शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज यांनी पटकावले आहे.

वकृत्व हिंदी विजेते

प्रथम पारितोषिक शंकराव मोहिते महाविद्यालय अकलूज. द्वितीय पारितोषिक श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी. तर तृतीय पारितोषिक सोलापूर सोशल असोशियन महाविद्यालय सोलापूर यांनी पटकावले आहे.

वकृत्व इंग्रजी विजेते

प्रथम पारितोषिक श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, द्वितीय पारितोषिक कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर. तृतीय पारितोषिक वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स यांनी पटकावले आहे.
वाद विवाद स्पर्धा विजेते 

प्रथम पारितोषिक कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर, द्वितीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर आ धी विभाग सोलापूर. तृतीय शंकराव मोहिते महाविद्यालय अकलूज यांनी पटकावले आहे.

काव्यवाचन विजेते 

प्रथम पारितोषिक श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी. द्वितीय वसुंधरा कला महाविद्यालय सोलापूर. तृतीय सोशल महाविद्यालय सोलापूर यांनी पटकावले आहे.

कथाकथन विजेते 

प्रथम पारितोषिक संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर. द्वितीय कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर. तृतीय कस्तुर बाई कॉलेज ऑफ एज्युकेशन यांनी पटकावले आहे.

प्रश्नमंजुषा विजेते 

प्रथम श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी. द्वितीय संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा. तृतीय हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर यांनी पटकावले आहे.

शास्त्रीय नृत्य विजेते

प्रथम पारितोषिक संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर. द्वितीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आ धी विभाग सोलापूर. तृतीय वालचंद कॉलेज सोलापूर यांनी पटकावले आहे.

शास्त्रीय तालवाद्य विजेते 

प्रथम पारितोषिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधि विभाग सोलापूर. द्वितीय डी बी एफ दयानंद महाविद्यालय सोलापूर. तृतीय श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी यांनी पटकावले आहे.

सुगम संगीत विजेते

प्रथम पारितोषिक हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर. द्वितीय पारितोषिक संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा. द्वितीय पारितोषिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आधी विभाग सोलापूर यांनी पटकावले आहे.

समूहगीत विजेते 

प्रथम पारितोषिक संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर. द्वितीय पारितोषिक बी एफ दयानंद कॉलेज सोलापूर. तृतीय पारितोषिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आधी विभाग सोलापूर यांनी पटकावले आहे.

फोक आर्केस्ट्रा विजेते 

प्रथम पारितोषिक बी एफ दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर. द्वितीय शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज. तृतीय श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी यांनी पटकावले आहे.

पथनाट्य विजेते 

प्रथम क्रमांक श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, द्वितीय क्रमांक पारितोषिक विभागून दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालय मंगळवेढा व सोशल महाविद्यालय सोलापूर , तृतीय क्रमांक पारितोषिक विभागून अहिल्यादेवी होळकर सोलापूर आधी विभाग व शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज यांनी पटकावले आहे.

मूकनाट्य विजेते 

प्रथम क्रमांक पारितोषिक शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, द्वितीय क्रमांक विभागून A.R बुर्ला महिला कनिष्ठ महाविद्यालय व श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, तृतीय क्रमांक विभागून वालचंद कला महाविद्यालय व सोशल कॉलेज सोलापूर यांनी पटकावले आहे.

लघुनाटीका स्पर्धा विजेते 

प्रथम पारितोषिक वसुंधरा कला महाविद्यालय व शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज.द्वितीय सांगोला महाविद्याला सांगोला व श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी.तृतीय क्रमांक पारितोषिक विभागून माणदेश महाविद्यालय व संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा यांनी पटकावले आहे.

नकला विजेते 

प्रथम पारितोषिक श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, द्वितीय सोशल महाविद्यालय सोलापूर. तृतीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आधी विभाग सोलापूर यांनी पटकावले आहे.

एकांकिका विजेते : 27 गुणाची कमाई करून देणारा कला

प्रथम क्रमांक पारितोषिक मानकरी श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, द्वितीय क्रमांक पारितोषिक विभागून श्री छत्रपती शिवाजी महाराज रात्र महाविद्यालय व संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर, तृतीय क्रमांक पारितोषिक विभागून सांगोला महाविद्यालय, सांगोला व माणदेश महाविद्यालय जुनोनी यांनी पटकावले आहे.

मंच संयोजन विजेते 

प्रथम- छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय सोलापूर, द्वितीय श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, तृतीय डी बी एफ दयानंद महाविद्यालय सोलापूर यांनी पटकावले आहे.

उत्कृष्ट पुरुष अभिनय विजेते 

प्रथम पारितोषिक मानकरी श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, द्वितीय क्रमांक विभागून संगमेश्वर, सोमेश्वर महाविद्यालय सोलापूर व माणदेश महाविद्यालय जुनोनी यांनी पटकावले आहे.

उत्कृष्ट स्त्री अभिनय विजेते 

प्रथम पारितोषिक छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय सोलापूर. द्वितीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आदी विभाग सोलापूर आणि ग्रीन फिंगर्स महाविद्यालय अकलूज, यांनी पटकावले आहे.

उत्कृष्ट दिग्दर्शन विजेते 

प्रथम क्रमांक संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर, द्वितीय क्रमांक श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, तृतीय सांगोला महाविद्यालय सांगोला यांनी पटकावले आहे.

लोकनृत्य स्पर्धा विजेते 

प्रथम पारितोषिक पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आधीविभाग सोलापूर, तीय कर्मवीर भाऊराव पाटील हाविद्यालय पंढरपूर व सांगोला महाविद्यालय सांगोला, तृतीय आ.र बुर्ला महाविद्यालय व डी बी एफ दयानंद महाविद्यालय सोलापूर यांनी पटकावले आहे.

Back to top button