कर्नाटकातून सांगोला मार्गे पंढरपूरहून जाणारा ४४.५० लाखांच्या गुटखा जप्त | पुढारी

कर्नाटकातून सांगोला मार्गे पंढरपूरहून जाणारा ४४.५० लाखांच्या गुटखा जप्त

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातून सांगोला मार्गे पंढरपूरहून टेंभूर्णीकडे ट्रक भरुन जाणारा प्रतिबंधित गुटखा पंढरपूर शहर पोलीसांनी सरगम चौकातील अहिल्या पूलाजवळ पकडला आहे. या ट्रकमध्ये 27 लाख 60 हजार रुपये किंमतीची हिरा पान मसाल्याची 120 पोती, तर सुंगीधीत तंबाखुची 6 लाख 90 हजार रुपये किंमतीची 30 पोती आणि 10 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण 44 लाख 50 हजाराचा मुद्देमाल पंढरपूर शहर पोलीसांनी पकडला. तसेच एकाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातून सांगोला मार्गे पंढरपूरहून टेंभुर्णीकडे लाल रंगाच्या मालवाहतूक ट्रक (एम.एच. 09, सी. ए. 3630) मधून प्रतिबंधीत व विक्रीस मनाई असलेला गुटखा, तंबाखू घेवून जात होता. पंढरपूर शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शाखेचे पोलिसांनी सरगम चौकातील रिलायन्स पेट्रोलपंपा जवळ ट्रकला थांबवून तपास केला. या तपासामध्ये प्रतिबंधीत असलेला हिरा पानसमाला व सुगंधीत तंबाखू ट्रकमध्ये सापडले.

अन्न व औषध प्रशासनाला याबाबत माहिती देवून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान, ट्रकभरुन गुटखा पकडण्यात आल्याने गुटखा माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा 

Back to top button