... तर मंत्र्यांना विमानसेवा कायमस्वरूपी बंद करा : सोलापूर विकास मंचचा ठराव | पुढारी

... तर मंत्र्यांना विमानसेवा कायमस्वरूपी बंद करा : सोलापूर विकास मंचचा ठराव

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : होटगी रोड विमानतळावरून अद्याप नागरी विमानसेवा सुरू झालेली नाही. सामान्य जनतेसाठी विमानसेवा सुरु व्हावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सनदशीर मार्गाने जनतेने लढा दिला आहे. त्यामुळे  आता जोपर्यंत सामान्य जनतेसाठी विमानसेवा सुरू होत नाही तोपर्यंत मंत्री आणि व्ही.व्ही.आय.पींनादेखील विमानसेवा कायमस्वरूपी बंद करा, असा ठराव सोलापूर विकास मंचच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

चक्री उपोषण इशारा

केंद्रीय नागरी उड्डान मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाला वेळोवेळी निवेदने देवून सोलापूरची विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी केली. याबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. याप्रश्‍नी सोलापूर विकास मंचच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. या वेळी सर्वसामान्‍यांना विमान सेवा सुरु झाली नाही तर  आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीपर्यंत नागरी विमानसेवा सुरू करावी. अन्यथा चक्री उपोषण करण्याचा इशाराही माजी आमदार नरसिंह मेंगजी आणि माजी उपमहापौर राजेश काळे यांनी दिला .

यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, गणेश पेनगोंडा, विजय कुंदन जाधव, आनंद पाटील, अनंत कुलकर्णी, प्रतिक खंडागळे, अॅड. दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर, कैलास लांडगे, सुहास भोसले, जयश्री तासगावकर, गौरी आंमडेकर, अनिता कुलकर्णी, डॉ. सुभाष वैकुंठे, डॉ. दिलीप बुरटे, अरविंद रंगा, बालकृष्ण अवदुत, भक्ती जाधव, भारत कसबे, गणेश शिलेदार, नागनाथ मेंगाणे, इक्बाल हुंडेकरी, रमेश खुने, दत्तात्रय जमादार, नितीन बिज्जरगी, डॉ. अमोल गोडसे, काशीनाथ भतगुणगी, रेवणसिद्ध जवळकोटे, सुर्यकांत पारेकर, नागनाथ मेंगाणे, चंद्रकांत ईश्वरकट्टी, महेश सावंत, अमोल तटकरे, दीपक भंडारे, व्यंकटेश पोतदार, बिबिषन कांबळे, महेश घोडके, विलास मोरे आदी. उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button