सांगोला मतदारसंघ रस्त्यांसाठी 100 कोटी रुपये निधी | पुढारी

सांगोला मतदारसंघ रस्त्यांसाठी 100 कोटी रुपये निधी

सांगोला : पुढारी वृत्तसेवा :  पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यामध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील रस्ते दुरुस्तीसाठी 50 कोटीचा नवीन निधी मंजूर झाला आहे. याच वर्षी मार्च महिन्यात अर्थसंकल्पात 50 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्या सर्व कामांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. सर्व कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून येत्या महिन्यात सर्व कामे चालू केली जातील. सध्या मंजूर झालेल्या 50कोटी निधीच्या कामांची अंदाजपत्रके तयार करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

या निधीमधून सांगोला मतदार संघातील दिघंची जिल्हा हद्द खवासपूर, लोटेवाडी, सोनलवाडी, एखतपूर, सांगोला, वाढेगाव, आलेगाव, वाकी, घेरडी, वाणी चिंचाळे, भोसे रस्ता रामा 386 कीमी 1/300 ते 5/300, 22/500 ते 24/00 मध्ये सुधारणा करणे मंजूर रक्कम 2 कोटी 50 लाख, रामा 166 ते हातीद, मानेगाव, जवळा, घेरडी, हुन्नूर, मानेवाडी, मरोळी, शिवनगी ते रामा 516 अ रस्ता रामा 389 किमी 20/00 ते 22/00 मध्ये सुधारणा करणे, मंजूर 1 कोटी 50 लाख, अजनाळे, यलमर मंगेवाडी, वाटंबरे, राजुरी, हटकर, मंगेवाडी, जुजारपूर, जुनोनी, कोळा रस्ता रामा 389 किमी 0/00 ते 6/00 आणि 17/300 ते 23/00 मध्ये सुधारणा करणे तालुका मंजूर रक्कम 5 कोटी. सांगोला, दिघंची, धायटी, शिरभावी, उंबरगाव, पंढरपूर रस्ता रामा 388 किमी 6/800 ते 14/00 मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे तालुका मंजूर रक्कम 3 कोटी, सांगोला, चिंचोली, धायटी, शिरभावी, उंबरगाव, पंढरपूर रस्ता रामा 388 वर किमी 6/800 ते 14/00 मध्ये पूल बांधणे तालुका मंजूर रक्कम 3 कोटी.

एकतपूर ते रामा 125 रस्ता प्रतिमा 86 किमी 0/00 ते 2/720 मध्ये सुधारणा करणे मंजूर रक्कम 2 कोटी, वाटंबरे, अकोला, कडलास, जवळे, डिकसळ, नराळे ते जिल्हा हद्द रस्ता प्रतिमा 87 किमी 2/00 ते 9/300 आणि 30/00 ते 33/00 मध्ये सुधारणा करणे मंजूर रक्कम 5 कोटी. बचेरी, शिंगोर्णी, कटफळ, अचकदाणी, सोनलवाडी, यलमार मंगेवाडी, वाटंबरे, निजामपूर, हनंमत गाव, सोनंद, भोपसेवाडी, घेरडी रस्ता प्रतिमा 89 किमी 62/800 ते 67/30 मंजूर रक्कम 2 कोटी 50 लाख. प्रतिमा 86 ते अजनाळे कमलापूर, वासुद, आकोला, निजामपूर डोंगरगाव ते जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा 110 किमी 16/00 ते 18/00 आणि 19/200 ते 21/00 मध्ये सुधारणा करणे मंजूर रक्कम 2 कोटी. शिरभावी, मेटकरवाडी, मेथवडे, देवळे, सावे, वाढेगाव, मेडशिंगी, आलेगाव, वाकी, घेरडी ते हंगीरगे रस्ता प्रजिमा 163 किमी 42/500 ते 44/500 मध्ये सुधारणा करणे मंजूर रक्कम 1 कोटी 20 लाख.

सावे, बामणी, चिंचोली ते रामा 124 रस्ता प्राजिमा 181 किमी 0/00 2/00 मध्ये सुधारणा करणेमंजूर रक्कम 1 कोटी 20 लाख. प्रजिमा.164 ते कोळे, करगणी रस्ता प्रजिमा 183 किमी 0/00 ते 2/800 मध्ये सुधारणा करणे मंजूर रक्कम 1 कोटी 50 लाख. प्रजिमा 182 ते एखतपुर गोडसेवाडी, वासुद, अकोला ते रामा 125 रस्ता प्रतिमा 195 किमी 1/500 ते 3/00 मध्ये सुधारणा करणे मंजूर रक्कम 1 कोटी. वाढेगाव, कडलास, निजामपूर, राजुरी, उदनवाडी, पाचेगाव, सोमेवाडी, शेटफळ ते जिल्हा रस्ता प्रतिमा 196 किमी 4/00 ते 6/00 आणि 15/00 ते 25/00 मध्ये सुधारणा करणे मंजूर रक्कम 8 कोटी. घेरडी ते नराळे रस्ता प्रतिमा 198 किमी 0/00 ते 5/00 मध्ये सुधारणा करणे तालुका मंजूर रक्कम 3 कोटी. सांगोला, इमडेवाडी, लक्ष्मीदहिवडी रस्ता प्रजिमा 199 किमी 5/00 ते 6/00 मध्ये सुधारणा करणे मंजूर रक्कम 60 लाख. सांगोला, मेडशिंगी, बुरलेवाडी रस्ता प्रजिमा 199 किमी 0/00 ते 2/300 मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे मंजूर रक्कम 2 कोटी.

पंढरपूर तालुक्यासाठी निधी
सांगोला मतदार संघातील पंढरपूर तालुक्यातील रामा 143 ते लोणारवाडी गार्डी रस्ता प्रतिमा 173 किमी 0/00 ते 2/00 मध्ये सुधारणा करणे मंजूर रक्कम 1 कोटी. रामा 9 ते हिवरे कोण्हेरी पेनुर येवती भोसे कुरोली (पट) भाळवणी महिम महूद रस्ता प्रजिमा 81 किमी 46/700 ते 57/00 मध्ये सुधारणा करणे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मंजूर रक्कम 4 कोटी अशी एकूण50कोटी रुपयांची कामे सांगोला मतदार संघासाठी मंजूर झाली असल्याने या रस्ता दुरुस्तीचे कामामुळे कामांमुळे तालुक्यातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

Back to top button